सीएसआर

अयं निजः परोवेति गणना लघुचेतसाम् । उदार चरितानां तु वसुधैव कुटुंबकम् ।

हा आपला हा परका असें सामान्य लोक मानतात, परंतु तेच श्रेष्ठ असतात जे सर्व जगाला आपलं कुटुंब मानतात.

आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय विकास साधण्यासाठी आम्ही स्थानिक पातळीवरील समुदायासोबत काम करतो. त्यांच्यासाठी उदरनिर्वाहाची नवीन साधनं निर्माण करतो, महिलांचं आर्थिक सक्षमीकरण करतो आणि त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचवतो. आमचं असं ठाम आहे की एका व्यक्तीच्या, कुटुंबाच्या आणि देशाच्या परिवर्तनामध्ये शिक्षणाची मोलाची भूमिका असते. आमचे प्लांट्स हे भौगोलिकरित्या दुर्गम भागात वसलेले आहेत. जिथे चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळणं ही एक समस्या होती.
त्यामुळेच सामाजिक जाणिवेचं भान ठेवून आम्ही या ठिकाणी शाळा बांधल्या आणि शैक्षणिक सुविधा निर्माण करण्यात सक्रिय सहभाग घेतला. आमच्या कंपनीचे संस्थापक पद्मभूषण करमशी जेठाभाई सोमय्या यांनी दि के. जे. सोमय्या ट्रस्ट आणि दि सोमय्या ट्रस्ट यांचीही स्थापना केली. समाजाच्या ऋणांची परतफेड करणं आणि समाजात समानता आणण्यासाठी अविरत झटत राहणं या मूल्यांवर त्यांचा ठाम विश्वास होता. त्यानंतर त्यांनी सोमैय्या विद्याविहार, दि. क. जे सोमैय्या मेडिकल ट्रस्ट, दि गिरीवनवासी एज्युकेशन ट्रस्ट आणि प्रगती मंडळ यांची स्थापना केली. याअंतर्गत 2 दोन हॉस्पिटल्स आणि 30 पेक्षा जास्त शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. जिथे वैद्यकीय, इंजिनीअरिंग, कला आणि विज्ञान, धर्म, व्होकेशनल स्टडीज, शिक्षण, भाषा, आदिवासी विकास आणि इतर अनेक क्षेत्रांमधल्या प्राथमिक शिक्षणापासून ते पीएचडीपर्यंत, व्होकेशनलपासून ते व्यावसायिक शिक्षणापर्यंतच्या सुविधा पुरवल्या जातात.
आमच्या संस्थापकांनी सुरू केलेली ही परंपरा सोमय्या कुटुंबाने पुढे सुरू ठेवली आहे. या संस्थांचं काम डॉ. एस. क. सोमैय्या यांनी पुढे नेलं आणि आता आमचे सध्याचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संस्थापक समीर सोमय्या हा वारसा पुढे नेत आहेत. या संस्थांमध्ये सध्या 38 हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.