रिटेल शुगर
जीवना साखर – सुखद राहणीमानासाठी खाद्यान्नामधील शुद्धतेची पुनर्रचना
गेली 75 वर्षं अविरतपणे सुरू असलेल्या साखर कारखान्यातून जीवना क्लासिक शुगरची निर्मिती केली जाते. उत्कृष्ट दर्जाचा ऊस, पर्यावरणाला पूरक शेती पद्धती, कल्पक आणि प्रमाणित उत्पादन प्रक्रिया आणि दर्जा राखण्याची वृत्ती यामुळे साखर निर्मितीमध्ये शुद्धता, सुदृढता आणि सातत्य दिसून येतं. इष्टतम आकाराचे साखराचे खडे सहज वितळतात. त्यामुळे उत्तम मधुरता प्राप्त होते आणि कचराही तयार होत नाही.
Make an Enquiryजीवना क्लासिक शुगरचे फायदे
- शुद्ध साखर
उत्तम प्रतीच्या ऊसापासून बनवण्यात आलेली शुद्ध आणि उत्कृष्ट दर्जाची साखर जीवना क्लासिक शुगरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचते.
- निरोगी आणि हातांचा वापर न करता.
निरोगी साखर बनवण्यासाठी आम्ही हातांचा वापर न करता कल्पक आणि आंतरराष्ट्रीय मानकांनुसारच प्रक्रिया करतो.
- सुरक्षित सल्फरमुक्त उत्पादन प्रक्रिया
आमच्या उत्पादन प्रक्रिया ह्या फूड अँड सेफ्टी स्टँडर्ड्स ऑथोरिटी ऑफ इंडिया प्रमाणित असतात. त्यामुळेच आमची साखर ही सेवनासाठी सुरक्षित आहे.
- दर्जामध्ये सातत्य
शेतात आणि रिफायनरीमधील प्रमाणित आणि शाश्वत प्रक्रियांमुळे साखरेच्या दर्जामध्ये सातत्य राखणं शक्य होतं.
- साखरेच्या प्रत्येक स्फटिकामध्ये दडलेलं माधुर्य
योग्य प्रमाणातलं माधुर्य महत्त्वाचं असतं हे आम्ही जाणून आहोत. ऊसाच्या पहिल्या आणि उत्तम रसामधून बनवण्यात आलेले आमचे मध्यम आकाराचे साखरेचे स्फटिक योग्य प्रमाणात माधुर्य देतील याची हमी आम्ही तुम्हाला देतो.