शाश्वत उत्पादने

शाश्वततेबाबतचं आमचं धोरण हे आमच्या बिझनेस प्लानचाच एक भाग आहे. आणि समाजाला सतत योगदान देण्याबाबतची निष्ठाही त्याचाच एक हिस्सा आहे. एक उपायकर्ता या नात्याने केमिकल इंडस्ट्री ही शाश्वततेला वृद्धिंगत करणारी आहे.
रसायनांची निवड हे शाश्वततेसाठी सर्वात महत्त्वाचं आहे. रसायनाची शाश्वतता ही त्याच्या उत्पत्तिस्थान, नैसर्गिक स्रोतांचं संवर्धन, उत्पादन पद्धती आणि उत्सर्जन यावर ठरते.
आम्ही अशी उत्पादनं तयार करतो ज्यांचा पर्यावरणावर कमीत कमी परिणाम होईल तसंच त्यांची कार्याक्षमताही उत्तम असेल.
स्रोतांचा हरितशक्ती निर्मितीसाठी वापर करत ग्रीनहाउस गॅसेसची तीव्रता कमी करणं आणि जैवइंधनं तसंच इथेनॉलपासून रसायनांची निर्मिती करणं हे हेच दाखवून देतं की ऊसासारखं साधं पीकही वैविध्यपूर्ण उत्पादनांची निर्मिती करू शकतं. यातून हेच दिसून येतं की पारंपरिक इंधनांना पर्याय आहे आणि आमची उत्पादनं हे त्याचंच उदाहरण आहे.