कृषी संशोधन

शेतीमधून मिळणा-या अक्षय, अपारंपरिक स्रोतांवर काम करणं आणि पारंपरिक स्रोतांवर काम करणं यामध्ये मुलभूत फरक आहे. कृषीआधारित फीडस्टॉकच्या बाबतीत आपल्याला अनेक वर्षं हे स्रोत वापरता येऊ शकतात. केआयएएआर या कृषी संशोधन संस्थेला गोदावरी बायोरिफायनरीज अनुदान देते. या संस्थेमध्ये ऊसाच्या नव्या प्रजाती विकसित करणं, मृदाचाचणी तसंच मृदाविज्ञान, आंतरपिकं आणि इतर नवीन पद्धतींबाबत संशोधन केलं जातं. असं करत असताना तयार होणारं पीक हे उत्पादनाला पूरक असेल, जमिनीचा कस टिकून राहिल अथवा वृद्धिंगत होईल आणि शेतकरी अधिक समृद्ध होईल याची काळजी घेतली जाते.

कृषी संशोधनामध्ये समाविष्ट असणारी क्षेत्रं

ऊसाच्या नवीन प्रजातींची चाचणी करणं
केआयएएआर हे ऊसाच्या विविध प्रजातींची चाचणी करणारं द्वीपकल्पातील (Peninsular zone) एक स्वयंसेवी केंद्र आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या ऑल इंडिया कोऑर्डिनेटेड रिसर्च प्रोजेक्ट ऑन शुगरकेनच्या (एआयसीआरपी-एस) अखत्यारित हे केंद्र येतं. या कार्यक्रमांतर्गत आम्हाला कोइम्बतूरस्थित शुगरकेन ब्रीडिंग इन्स्टिट्यूट (एसबीआय) तसंच पेनिन्सुलर झोनमधील राज्यांमधल्या कृषी विद्यापीठांमध्ये तयार झालेले उत्तम दर्जाचे ऊसाचे क्लोन्स पुरवले जातात. एआयसीआरपी-एसने ठरवून दिलेल्या तांत्रिक सूचनांनुसार या क्लोन्सची चाचणी केली जाते आणि उच्च दर्जाची, विभागवार उत्तमरित्या उपजाऊ प्रजातींचं वर्गीकरण केलं जातं.
अशा प्रकारे आमच्याकडे नवीन प्रजाती विकसित केल्या जातात. एसबीआय आणि इतर संशोधन संस्थांकडून आम्हाला विशिष्ट प्रकारचे सॅम्पल्सही मिळतात ज्याचं मूल्यमापन आम्ही आमच्या इथे करतो. याशिवाय आम्ही आमच्या इथल्या शेतात निवडक प्रजातींची प्रात्यक्षिकंसुद्धा करतो.
एनर्जी केन्सची चाचणी
नवीन एनर्जी केन्सच्या चाचणीसाठी आम्ही एसबीआयसोबत सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार हाय बायोमास आणि ड्युअल पर्पज (इथेनॉल आणि हाय फायबर) असे दोन प्रकारचे एनर्जी केन्स आम्हाला प्राप्त होतात. हाय बायोमासपासून इथेनॉलसाठी चांगल्या प्रतीचा फीडस्टॉक आणि हाय फायबरपासून इथेनॉल मिळवणं शक्य होणार आहे.
मृदाविज्ञान

मृदा चाचणी

आमची प्रयोगशाळा मृदा आणि जल संशोधनासाठी सुसज्ज आहे. ऊस विभागाचे कर्मचारी आमच्या शेतक-यांकडून मातीचे नमुने गोळा करतात आणि प्रयोगशाळेला पुरवतात. या नमुन्यांवर प्रक्रिया केली जाते आणि त्यांचा पीएच, विद्युत वाहकता आणि त्यातील उपलब्ध पोषक द्रव्यं (N, P, K आणि महत्त्वाची मायक्रोन्यूट्रिशण्ट्स) यांचं विश्लेषण केलं जातं. या चाचण्यांच्या निष्कर्षावर आधारित खतं आणि सुधारित शिफारशींचा अहवाल तयार केला जातो. हाच अहवाल ऊस विभागामार्फत शेतक-यांपर्यंत पोहोचवला जातो.
पारंपरिक आणि सेंद्रीय तंत्राचं शिक्षण आणि अंमलबजावणी
भारतीय कृषीव्यवस्थेमध्ये पारंपरिक शेतीपद्धती विपुल प्रमाणात आढळतात. काळानुरूप आधुनिक रासायनिक पद्धतींमुळे या पारंपरिक पद्धती हळूहळू मागे पडत चालल्या आहेत. सेंद्रीय खतांचा वापर कमी होत चालला आहे. रासाय़निक खतांचा आणि कटकनाशकांचा स्वैर वापर याचा जमिनीच्या कसदारपणावर विपरीत परिणाम होत आहे. म्हणून पिकांच्या उत्पादनात पारंपारिक पद्धती शिकण्याची आणि पुनरुजीवित करण्याची गरज आहे त्याचबरोबर रासायनिक खतांसोबतच सेंद्रीय खतांचा वापर करणे आवश्यक आहे.
शेत जमीनीची उत्पादकता वाढावी आणि जमीनीचा कस टिकावा यासाठी आम्ही सेंद्रीय शेती संबंधित देशी ज्ञानाचे दस्तावेज करत आहोत आणि उपलब्ध शेतजमिनीत असा सेंद्रीय कच्चा माल तयार करत आहोत, व त्याच्या एकत्रित उपयुक्तेतबाबत प्रयोग करत आहोत.
उत्पन्न सुधारण्यासाठी पिकांमधील भूमितीक बदल:
पिंकाची भूमिती पिकांची संख्या, पानाचा निर्देशांक, किरणांचा वापर, आणि जमिनीचा वीपर हे ठरवते. आणि म्हणून याचा अभ्यास ऊसाच्या उत्पादनात महत्वाचा ठरतो. पिकांची भूमिती हे विविध सांस्कृतिक कार्य सिद्धीस नेण्यासाठी देखील महत्वाचे ठरते. यांत्रिकीकरण आणि ठिबक सिंचनाच्या येण्याने पिकांसाठी विस्तीर्ण रांगेची भौमितीक रचना आवश्यक झाली. आम्ही विशिष्ट तंत्रज्ञान मानक मानून त्याचा प्रसार केला. याशिवाय आम्ही विस्तिर्ण रांगेच्या पिकपद्धती साठी प्रयोगशील आहोत.
आंतरपिके आणि चक्री पिकांची शिफारस
उत्पादन संसाधनांचा सर्वोत्कृष्ट वापर करण्यासाठी आणि ऊस लागवड प्रक्रीयेचा नफा सुधारण्यासाठी, आम्ही आंतर पिके आणि चक्री पिकांसोबत प्रयोग केले. विस्तीर्ण रांगांत लागवड केलेल्या ऊसाच्या शेत जमीनीत अल्प कालावधीसाठी डाळी आणि भाज्यांची लागवड केल्यावर जमिनीचा कस वाढलाच पण नफा देखील मिळाला. तसेच, शेंगांचे पिक, हरीत खतांची पिके, (ग्रीन म्यॅन्यूर क्रॉप्स), हळद आणि सोयाबीन हे नफादायक आणि ऊसलागवडीच्या पिकांमध्ये सुधारक आणि जमिनीचा कस कायम राखण्यात उपयुक्त ठरले.
टिशू कल्चर आणि बियाणे उपचार यंत्रणा
टिशू कल्चर आणि उष्णता थिअरपी मार्फत आम्ही ऊसासाठी रोगमुक्त प्राथमिक बियाणे तयार करत आहोत आणि शेतक-यांच्या शेतात व्यावसायिक लागवडीसाठी माध्यमिक व व्यावसायिक नर्सरी उभारुन आम्ही प्रभावी त्रिस्तरीय नर्सरी कार्यक्रम राबवत आहोत.
हा कार्यक्रम रोग (ग्रासी शूट, राटून स्टन्टींग आणि पिवळी पाने) नियंत्रीत करण्यासाठी आणि पिंकांचे उत्पन्न कायम राखण्यासाठी मदत करतो.
ठिबक सिंचन
ठिबक सिंचन ही प्रक्रीया आहे ज्यात रोपांच्या मुळाशी लहानशा नळ्यांद्वारे थेंबथेंब पाणी दिले जाते. या पद्धतीमुळे सुमारे ४० % पाणी वाचते आणि पिकांच्या उत्पन्नात सुमारे २० % वाढ होते.आम्ही ठिबक सिंचन तंत्रावरती काम केले जी आत्मसात केलेल्या शेतक-यांचा आकडा लक्षणीय आहे. आम्ही ठिबक सिंचनाद्वारे उत्पादनात वाढ करणारे पदार्थ आणि खते प्रदान करण्यासाठी प्रयोगशील आहोत.

शेत नियंत्रणाच्या पद्धती समजून घेण्यासाठी इंटरनेट ऑफ थिंग्सचा वापर

आम्ही के. जे. सोमय्या अभियांत्रिकी आणि माहिती तंत्रज्ञान संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शेतीसाठी विशेषत: ऊसलागवडीसाठी इंटरनेट ऑफ थिंग्स वर काम करत आहोत.आमच्या टिशू कल्चर प्रयोगशाळेतील प्रकाश प्रणाली आय.ओ.टी(IOT) अंतर्गत आणली आहे. तसेच, मृदा चाचणी डेटा अहवाल आणि शिफारसी, ठिबक सिंचन पद्धत, सिंचन नियंत्रणासाठी जमिनीतील ओलाव्याचे मोजमाप, इत्यादींवर काम चालू आहे जे हळूहळू शेतक-यांना प्रदान करण्यात येतील.
  • केआयएएआर (KIAAR) आणि आमच्या संयुक्त परिश्रमांनी उत्पादनात ७० च्या दशकात 50 tha-1 ते आता 100 t ha -1 इतकी लक्षणीय वाढ दर्शवली आहे, आणि शेतक-यांच्या आर्थिक स्थितीत मोठ्या प्रमाणावर सुधारणा केली आहे.
  • उत्तम शेती अर्थव्यवस्थेविषयक पॅकेजेस, आणि उत्कृष्ट वेरीएटल कॉम्प्लेक्स मुळे निर्णायक दिवसांमध्ये १२८ वरुन सुमारे १८० दिवसांमध्ये वाढ झाली.
  • साखरेच्या पुर्नलाभात गेल्या ४ दशकांमध्ये ९.९३% ते ११.२५% इतकी लक्षणीय वाढ दिसली.ठिबक सिंचन तंत्रात उत्पादन वाढवण्यापलीकडे ५०% पर्यंत पाणी बचत करण्याची क्षमता आहे.
  • ठिबक फर्टीगेशन तंत्र हे २५% खत बचत करते आणि मोठ्या प्रमाणावर शेतक-याकडून आत्मसात केले जात आहे.