संशोधन
जगभरात ज्ञान हे कायमच महत्त्वपूर्ण होतं आणि ते कायमच महत्त्वपूर्ण राहिल. संशोधनावर आधारित ज्ञान निर्मिती करणं आणि त्याचा वापर करणं यावरच आमची वाढ अवलंबून आहे. झपाट्याने बदलणा-या या जगात ऊर्जा, इंधनाचे पारंपरिक स्रोत घटत असताना आमच्या संशोधनामध्ये अक्षय, अपारंपरिक स्रोत निर्माण करण्याची क्षमता आहे. समाजशास्त्र, कृषी, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, जैवतंत्रज्ञान, मॉलिक्युलर बायोलॉजी आणि इंजिनीअरिंगसारख्या क्षेत्रात आमचं संशोधन सुरू आहे.
कृषी संशोधन
शेतीमधून मिळणा-या अक्षय, अपारंपरिक स्रोतांवर काम करणं आणि पारंपरिक स्रोतांवर काम करणं यामध्ये मुलभूत फरक आहे. कृषीआधारित फीडस्टॉकच्या बाबतीत आपल्याला अनेक वर्षं हे स्रोत वापरता येऊ शकतात. केआयएएआर या कृषी संशोधन संस्थेला गोदावरी बायोरिफायनरीज अनुदान देते. या संस्थेमध्ये ऊसाच्या नव्या प्रजाती विकसित करणं, मृदाचाचणी तसंच मृदाविज्ञान, आंतरपिकं आणि इतर नवीन पद्धतींबाबत संशोधन केलं जातं. असं करत असताना तयार होणारं पीक हे उत्पादनाला पूरक असेल, जमिनीचा कस टिकून राहिल अथवा वृद्धिंगत होईल आणि शेतकरी अधिक समृद्ध होईल याची काळजी घेतली जाते.
संशोधन तपशीलबायोरिफायनिंग
खाद्य अन्न, इंधन, रसायनं, ऊर्जा, कंपोस्ट, मेण आणि इतर उत्पादनांच्या निर्मितीसाठी आम्ही कृषीआधारित फीडस्टॉक आणि बायोमास वापरतो. या प्रक्रियांना एकत्रितपणे बायोरिफायनिंग असं म्हणतात.
अत्याधुनिक साधनसामुग्री आणि विश्लेषणात्मक साधनांनी सज्ज अशी आमची संशोधन सुविधा आहे. पायलट प्लांटही ग्लास लाइन रिअॅक्टर, स्टेनलेस स्टील रिअॅक्टर्स, सेंट्रीफ्युजेस, फिल्टर्स, व्हॅक्युम ड्रायर्स, व्हॅक्युम डिस्टिलेशन युनिट्स, हायप्रेशन एसएस ३१६ ऑटोक्लेव्ह्जसारख्या अनेक साधनांनी सुसज्ज आहे. शून्यापेक्षा कमी तापमानापासून ते उच्च तापमानापर्यंतच्या फ्युजन रिअॅक्शन्स करवण्याची क्षमता आमच्या साधनांमध्ये आहे. व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य अशा प्रक्रिया आमच्या पायलट प्लांट्समध्ये अभ्यासल्या जातात. आणि त्याकरता आमच्याकडे अनुभवी शास्त्रज्ञ आणि रसायनशास्त्रज्ञांची टीम आहे.
आमच्याकडे होत असलेल्या केमिकल रिअॅक्शन्स
- अल्डोल कन्डेंसेशन
- अॅसेटायलेशन
- इस्टरिफिकेशन
- हायड्रोजनेशन
- ऑक्सिडेशन
- अॅसिटल फॉर्मेशन
- फर्मेंटेशन
संशोधन तपशील
कॅन्सर बायोलॉजी
कॅन्सरवरती काम करणारी आमची टीम, सॅथजेन, ही ब्रेस्ट आणि प्रोस्टेट कॅन्सर सेल्सवरील उपचारांसाठीच्या मॉलेक्युल्सच्या शोधावर काम करत आहे. कॅन्सर स्टेम सेल्सना समूळ नष्ट करणं हाच आमच्या संशोधनाचा केंद्रबिंदू आहे. आमचं औषध हे स्वतंत्रपणे मात्रा लागू करू शकतं आणि त्याशिवाय कॅन्सर उपचारांच्या इतर थेरपीजसोबतही घेता येऊ शकतं.
मॉलेक्युल्सचे अॅनालॉग्स रासायनिक पद्धतीने सिंथसाइज करणं, त्यांचे अधिक गुणकारी विघटन करणं आणि अँटी-कॅन्सर तसंच अँटी-कॅन्सर स्टेम सेल्ससाठी त्यांना तयार करणं याच मार्गाने आमचं संशोधन सुरू आहे. त्यानंतर या मॉलेक्युल्सच्या कामगिरीची तुलना आम्ही सिसप्लॅटिनसारख्या इंडस्ट्री स्टँडर्ड्सशी करतो.
इंडस्ट्री स्टँडर्ड्सपेक्षा अधिक गुणकारी मॉलेक्युल्स आम्हाला सापडलेले आहेत आणि सध्या प्री-क्लिनिकल फेजमध्ये त्यांच्यावर काम सुरू आहे. एका मॉलेक्युलसाठी आम्हाला भारत सरकारचं बीआयआरएसी अनुदानदेखील मिळालं आहे.