लहान मुलांच्या शिक्षणासाठी
आंगणवाडी – सोमैया शिशुविहार
ग्रामीण विकासासाठी महत्त्वाची पायरी म्हणजे लहान मुलांचं शिक्षण. फक्त आदिवासी भाषा ज्ञात असणा-या या मुलांना; ज्या भाषेतून शिक्षण दिलं जातं त्या भाषेशी ओळख करून दिली जाते.
मुलभूत गरजांपासून वंचित राहणा-या शून्य ते ६ वर्षे वयोगटातील मुलांना पोषक वातावरण मिळावं यासाठी आम्ही राज्य सरकारच्या आंगणवाडी प्रकल्पाशी स्वतःला जोडून घेतलं आहे. कर्नाटकातल्या बेळगाव आणि बागलकोट जिल्ह्यातील गावांमधल्या तीन ते पाच वर्षे वयोगटातील मुलांना मूल्यवर्धित शिक्षण मिळावं यासाठी आम्ही सोमैया शिशुविहारच्या माध्यमातून २० आंगणवाडी केंद्रांना सहाय्य करत आहोत. शैक्षणिक साहित्य, खेळणी, स्वयंसेवकांना मानधन, शिक्षकांना प्रशिक्षण आम्ही देतो तसंच वर्ग नियमितपणे भरले जातील याकडेही आम्ही जातीने लक्ष घालतो.
वर्षाकाठी दोन हजार पेक्षा जास्त मुलं याचा लाभ घेतात.
सोमैय्या शिशुविहार (आंगणवाडी केंद्र)
माझं नाव अर्जुन. आमच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत म्हणजे शेती आणि कृषी वेतन. मला तीन मुलं आहेत. एक दुस-या इयत्तेत आहे आणि दोघे प्रायमरीमध्ये. आम्ही शेतावरल्या घरातच राहतो.
माझा मुलगा सोमैय्या शिशुनिकेतनमध्ये शिकला आणि माझ्या दोन्ही मुली तिथेच शिकत आहेत. आमच्या इथे कुठलीही सरकारी पूर्व प्राथमिक शाळा नसल्यामुळे हे केंद्र माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप उपयुक्त आहे. माझ्या घरापासून सरकारी आंगणवाडी ३ किलोमीटरवर आहे. आम्ही रोज शेतावर कामाला जातो. त्यामुळे इतक्या दूर सरकारी आंगणवाडीमध्ये मुलांना पोहोचवणं आणि परत आणणं हे आमच्यासाठी कठीण काम आहे. या केंद्राचा आम्हाला फारच फायदा झाला आहे आणि आम्ही समीरवाडी कारखान्याचे त्यासाठी आभारी आहोत.
श्री. अर्जुन एम. दद्दीमानी
- वय – ३२ वर्षे
- |
- व्यवसाय – शेती
- |
- गाव – हंडीगुंड गाव, बेळगाव जिल्हा, कर्नाटक
- |
- पात्रता – तिसरी इयत्ता
माझं नाव निंगाप्पा. मी शेती करतो. मला चार मुलं आहे. त्यापैकी दोघं सोमैया पूर्व-प्राथमिक शाळेत जातात. दुसरी दोघं तीन वर्षांखालील आहेत.
आमच्या घराजवळ कुठलीही सरकारी शाळा नसल्यामुळे सोमैया स्कूल आमच्यासाठी फार उपयुक्त आहे. मी अशिक्षित आहे पण माझी दोन्ही मुलं शिकत असल्याचा मला आनंद आहे.
श्री. निन्गाप्पा एस. ब्याकोड
- वय : ३० वर्षे
- |
- व्यवसाय : शेती
- |
- गाव : केसरागोप्पा गाव, कर्नाटक मधील बागलकोट जिल्हा
- |
- शिक्षण: नाही