धोरण
सामान्यत्वाच्या पलिकडे चला
सर्वप्रकारे ‘सामान्यत्वाच्या पलिकडे चला’ हेच आहे आमचं धोरण. हे धोरण राबवत असतानाच आम्ही आमचे शेतकरी, ग्राहक, समाज आणि सहकारी यांच्या गरजा पूर्ण करतो. ज्ञानाचा कुठे आणि कसा फरक पडेल हे समजून घेणं, बदलासाठी सदैव तयार राहणं आणि नवनिर्माण करणं हेच आहे आमचं धोरण. बायोमासाच्या प्रतियुनिटची उपयुक्तता वाढवणं आणि मूल्यवर्धन करणं हे आहे आमचं धोरण. कुठलाही फीडस्टॉक असो किंवा ऊस, इथेनॉल, काकवी, ऊसाची चिपाडं किंवा इतर पिकांची गुणवत्ता वाढवणं हेही आमचं धोरण आहे. भौतिक, रासायिनिक किंवा जैविक प्रक्रिया करून इंधन, ऊर्जा, रसायनं तसंच इतर उपयुक्त उत्पादनं तयार करणं. ग्राहक आणि पुरवठादारांमध्ये एक विश्वासू आणि जबाबदार भागीदार म्हणून आमचं नाव असावं यासाठी प्रयत्नशील असणं. उत्पादनांच्या विक्रीच्या माध्यमातून, ब्रँडनिर्मितीच्या माध्यमातून, शेतक-यांना त्यांची उत्पादनं तयार करण्यासाठी मदत करत आमच्याविषयी विश्वास निर्माण करणं हे आहे आमचं धोरण.
जग झपाट्याने बदलतंय आणि हा कायापालट होत असताना गरज आहे ती उपयुक्त उत्पादनांची, ती उत्तम पद्धतीने तयार करण्याची. या उपयुक्त उत्पादनं आणि उत्तम प्रक्रियेची गरज पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. बायोमासचं यांत्रिक, रासायनिक तसंच जैविक परिवर्तन करत पुनर्वापरयोग्य संसाधनांच्या माध्यमातून आम्ही उत्पादनं निर्माण करतो. भविष्याकडे वाटचाल करत असताना या क्षेत्रातल्या कौशल्याचा आम्ही वापर करू. शेतीमधूनच आम्ही आमचं फीडस्टॉक मिळवत असल्याने शेतीमधल्या कौशल्याचाही आम्ही पुरेपूर वापर करू.
आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरण अशा तिन्ही पातळींवर आमचा विकास व्हावा हीच आमची इच्छा आहे. हीच बांधिलकी आमच्या दृष्टिकोनाला आधार देते. त्याहीपुढे जाऊन असं म्हणता येईल की ज्ञान हे ख-या अर्थाने स्पर्धात्मक फायदे तयार करतं. प्रक्रिया, उत्पादन आणि अनुप्रयोग यांच्या ज्ञानाच्या माध्यमातून मूल्यनिर्मिती करण्यावर आमचा विश्वास आहे. शाश्वतता, ज्ञान आणि मूल्यनिर्मिती या तीन आधारस्तंभांवरच आमच्या कंपनीचं धोरण उभं आहे.
ज्ञान
ज्ञानाची महती ही त्रिकाळीत आहे. इतरांपेक्षा वेगळी उत्पादनं देण्यासाठी या ज्ञानाचा वापर करणं हेच आमचं धोरण आहे. बायोमासचा वापर आणि अनुप्रयोग या क्षेत्रात आम्ही संधी शोधू.
हाच दृष्टीकोन आमच्या धोरणांचा आधार आहे तसंच ऊसापासून साखर, काकवी, काकवीपासून इथेनॉल आणि इथेनॉल आधारित अॅसिटाल्डिहाइड, ईथाइल अॅसिटेटसारखी इतर रसायनं आणि उत्पादनं निर्माण करण्यातही याच दृष्टीकोनाची मदत आम्हाला झाली आहे. ऊसापासून मेण तयार करणे, विनोसे पासून बायोगॅस तयार करण्यासारख्या क्षेत्रात आम्ही काम केलेले आहे. आणि आता आम्ही बायोमासचं सेल्यूलोज, हेमिसेल्युलोज लिग्निन आणि इतर संलग्न उत्पादन निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. साखरेचं फर्मेंटेशन (आंबवणं) करून उच्चमूल्यित उत्पादनं तयार करण्याच्या दृष्टीनेही आमचं काम सुरू आहे. या क्षेत्रातील आमच्या ज्ञानवर्धनासाठी, आमच्या बौद्धिक संपदेचं रक्षण करण्यासाठी आणि जिथे गरज आहे तिथे परवाना प्राप्त करण्यासाठी आमचे संशोधक कार्यरत आहेत.
उत्पादनाविषयीच्या ज्ञानाला अनुप्रयोगाच्या ज्ञानाचा आधार असावा लागतो आणि ग्राहकांशी चांगले संबंधही. या दोहोंचा एकत्रितपणे स्पर्धात्मक फायदा होतो. ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नवनवीन उत्पादननिर्मितीकरता खाणकाम, कोटिंग्ज, अॅडिटिव्ह्ज इतकंच नाही तर शरीरात कार्यरत असणा-या स्टेम सेल्सवरही आमचे संशोधक काम करत आहेत.
ऊसाची नवीन प्रकार विकसित करण्यासाठी शेती आणि कृषीमृदाविज्ञान विषयातील आमच्या ज्ञानाचा आम्हाला उपयोग झाला आहे. आत्ताच्या इंटरनेटच्या युगात आणि आम्ही नवतंत्रज्ञानाला सोबत घेऊन शेतक-यांना मदत करत आहोत.
मूल्य निर्मिती
कच्च्या मालाच्या प्रति युनिटमागचं मूल्य वाढवण्याच्या धोरणाचा अवलंब करत आम्ही आता जोडउत्पादनांना आर्थिक मूल्य मिळवून देणे तसंच कच-याचा अधिकाधिक वापर करता यावा यासाठी प्रयत्न करत आहोत.
एका उत्पादनाचा कचरा हा दुस-या उत्पादनासाठी कच्चा माल असतो. मॅन्युफॅक्चरिंगमधून तयार होणा-या कच-याच्या बाबतीतही हेच तत्व लागू करता येऊ शकतो. एखाद्या उत्पादनाच्या प्रक्रियेदरम्यान तयार होणारा कचरा दुस-या उत्पादनाच्या प्रक्रियेसाठी वापरता यावा यासाठी नवीन कल्पना प्रत्यक्षात येण्याच्या दिशेने काम करणं हे आमचं धोरण आहे. उदा. सांडपाणी हे पुढील वापरासाठी तयार असं जोडउत्पादन असू शकतं. ऊसापासून आम्ही जेव्हा साखर तयार करतो तेव्हा काकवी हे जोडउत्पादन मिळतं. हेच जोडउत्पादन फर्मेंट केलं की इथेनॉल मिळतं आणि त्यासोबतच इतर अनेक जैवरसायनंही. कच-यापासून आम्ही ऊर्जानिर्मिती करतो आणि तीच आमच्या कारखान्यांमध्ये वापरतो, ग्रीडमध्ये स्टोअर करतो आणि त्याचाच वापर करून मेण तसंच जैविक मृदासत्वं तयार करतो. यामुळे आमच्या शाश्वतेत तर वाढ होतेच पण त्याशिवाय खर्चातही बचत होते.
ऊस लागवडीपासून, आम्हाला ऊसाचा पुरवठा करणा-या शेतक-यांकडून आणि आम्ही ज्या समाजासाठी काम करतो त्यांच्याकडून अधिकाधिक मूल्यनिर्मिती करणं हे आमचं धोरण आहे. उदाहरणार्थ – आम्ही शेतक-यांना आंतरपीक तसंच चक्रीपीक घेण्यासाठी उद्युक्त करतो, जेणेकरून त्यांच्या खर्चामध्ये कपात होईल आणि उत्पादकता वाढेल.
एक शाश्वत उत्पादक असा ब्रँड तयार करत आम्ही जागतिक बाजारपेठेत अन्नघटकाच्या क्षेत्रात नावारूपाला येत आहोत.
शाश्वतता
जमीन आणि शेतकरी
शेतीतून येणारा कच्चा माल आणि जळणाचा वापर हाच आमचा दृष्टीकोन असल्यामुळे शाश्वततेसाठी आम्हाला शेतकरी आणि त्यांच्या जमिनीचा वापर करणं गरजेचं आहे. जमीन निरोगी तर तिच्या गर्भातून येणारा परतावाही निरोगी. जर शेतकरी समृद्ध होत असेल आणि जमीन निरोगी, सुपीक असेल तरच आमची आणि अप्रत्यक्षरित्या आपणा सर्वांची वाढ होईल. शेतातून अधिक उत्पादकता आणण्यासाठी शेतक-याला मदत करणे आणि त्यांच्या मिळकतीमध्ये लक्षणीय वाढ करणं तसंच राहणीमानात सुधारण करत त्यांना शाश्वततेकडे नेणं हेच आमचं धोरण आहे. अनेक दशकांपासून शेतक-यांशी असणारी व्यापक भागीदारीतून आलेला अनुभव आणि मिळालेली शिकवण यावरच आमचं धोरण आधारलेलं आहे. विविध कृषीसंस्था, संशोधन संस्था, शिक्षणतज्ज्ञ तसंच तज्ज्ञांशी असणा-या सहयोगातून त्याला वृद्धिंगत करण्याचा आमचा मानस आहे. कमीत कमी जमिनीतून, रसायनांचा, पाण्याचा तसंच नैसर्गिक साधनसंपत्तीचा कमीत कमी वापर करत, अधिकाधिक निर्मिती करणं हे आमचं धोरण आहे.
शेतक-यांचं शिक्षण, जागरूकता आणि सहभागातून आम्ही हे साध्य करत आहोत. शेतक-यांना सगळ्याच्या केंद्रस्थानी ठेऊनच आम्ही आमचं धोरण आखत असतो. त्यामुळेच आम्ही शेतीविषयीच्या शाश्वततेची तसंच आमच्या शेतक-यांच्या समृद्धीची तजवीज करू शकतो.
प्रक्रिया
कारखानदारी प्रक्रियेलाही अल्पातून अधिक हा नियम लागू होतो. ऊर्जा, पाण्याच्या वापरासाठी, कच-याची कपात तसंच पुनर्वापराच्या माध्यमातून आम्ही हा नियम पाळत आहोत. खरंतर आम्ही कच-याकडे यशस्वी उत्पादनासाठीचा एक सशक्त स्रोत या नजरेने पाहतो. कार्बन उत्सर्जनाचीही आम्हाला जाणीव आहे. युएनएफसीसीसी प्रोग्रामच्या अंतर्गत आमच्या अनेक प्रकल्पांना यापूर्वी कार्बन क्रेडिट्स मिळालेली आहेत.
अक्षय स्रोतांपासून तयार होणा-या रसायनांची गरज पूर्ण करणं हे आमचं धोरण आहे. शाश्वत पद्धतींच्या माध्यमातून आम्ही विविध औद्योगिक क्षेत्रातल्या आमच्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करत आहोत.