इतिहास

एक विनम्र सुरूवात
१९३९ मध्ये सुरू झालेल्या गोदावरी साखर कारखान्यातूनच गोदावरी बायोरिफायनरीजची निर्मिती २००९ मध्ये झाली. दिवंगत (पद्मभूषण) श्री. करमशीभाई जेठाभाई सोमैया आणि त्यांचे पुत्र डॉ. शांतिलाल करमशीभाई सोमैया यांच्या प्रयत्नातून १९३९मध्ये सुरू झालेल्या या कारखान्याने गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेडच्या माध्यमातून भारताच्या औद्योगिक विकासामध्ये गेल्या सात दशकांपासून योगदान दिलेलं आहे. अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री समीर सोमैया यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली तसंच त्यांच्या कुशल सहका-यांमुळे ही कंपनी एक आघाडीची कंपनी ठरली आहे. तीन साखर कारखान्यांचा अंतर्भाव असणारी कंपनी देशातल्या ५०० साखर उत्पादक कंपन्यांच्या यादीत पहिल्या दहामध्ये आहे. सर्वाधिक मद्यनिर्मिती करणा-या कंपन्यांमध्ये आमचा समावेश आहे तसंच अल्कोहोलशी संबंधित रसायननिर्मितीचा पाया भारतात रचण्याचं श्रेय गोदावर बायोरिफायनरीजला जातं.

आमचे संस्थापक

श्री क जे सोमैया

वाणिज्य, शिक्षण आणि समाजसेवा अशा विविध क्षेत्रांमध्ये आपल्या अनमोल कार्याने स्वतःचा ठसा उमटवणं हे एक महत्त्वाचे कार्य आहे. पूजनीय श्रीमान करमशीभाई जेठाभाई सोमैया यांचा जन्म १६ मे १९०२ रोजी महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या मालुंजर या गावात १६ मे १९०२ रोजी झाला. मेहनत आणि सेवेच्या प्रति निष्ठा या दोन गोष्टी त्यांच्यामध्ये उपजतच होत्या.

एका सर्वसामान्य घरात जन्मलेले सोमैया कालांतराने पश्चिम महाराष्ट्रातील एक उद्योगपती म्हणून नावारूपाला आले. मुंबईतील न्यू हायस्कूलमधून (आत्ताचे भारदा स्कूल) आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर तरूण करमशी आपल्या अहमदनगरमधील मूळ गावी परतले. तेथे त्यांनी अथक परिश्रम सुरू केले आणि आपण जे काही करतो त्याच्या प्रती संपूर्ण निष्ठाही ठेवली. गांधीजींच्या स्वदेशी आणि सत्याग्रह या संकल्पनांनी तरूण करमशी यांचे विचार प्रेरित झाले होते.

तरूण करमशीभाई सोमैया यांनी आपल्या करिअरची सुरूवात त्यांच्या वडिलांच्या छोट्या किराणा मालाच्या दुकानात काम करण्यापासून केली. त्यानंतर ते त्या परिसरातल्या एका साखर व्यापार कंपनीत भागीदार झाले. त्यातूनच त्यांनी; महात्मा गांधी आणि स्वामी विवेकानंदांनी रंगवलेलं नव-भारताच्या निर्मितीतील स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले.

१९३९ साली श्री क जे सोमैया यांनी २ साखर कारखान्यांची स्थापना केली. त्यातील एक साकरवाडी येथे होता तर दुसरा लक्ष्मीवाडी येथे होता. त्यांनी स्वतःचा साखर व्यवसाय सुरू केला. त्यानंतरच्या काळात ते भारताचे साखर सम्राट म्हणून ओळखले जाऊ लागले.

वयाच्या ६०व्या वर्षी त्यांनी आपल्या व्यवसायाची आर्थिक जबाबदारी त्यांचे पुत्र डॉ. शांतीलाल सोमैया यांच्याकडे सोपवली आणि स्वतःला पूर्णपणे समाजकार्यात झोकून दिले. ‘तुम्हाला समाज जे काही देतो ते सर्व तुम्ही अनेक मार्गांनी परत केले पाहिजे’ या संकल्पनेशी ते कटिबद्ध होते. त्यांच्या लोकोपकाराशिवाय त्यांचे चित्र पूर्णच करता येणार नाही. तुम्ही त्याबद्दल अधिक या वेबसाइटच्या आऊटरिच विभागातून जाणून घेऊ शकता.

श्री क जे सोमैया हे अत्यंत प्रेमळ आणि दिलदार व्यक्तिमत्व होते. अत्यंत साधे आणि सर्वांना हवेहवेसे वाटणारे हे व्यक्तिमत्व सर्वसाधारणपणे कोणताही डाग नसलेल्या पांढऱ्या हातमागावर विणलेल्या खादीच्या कपड्यांमध्ये वावरत असायचे. त्यांनी शिस्तबद्धता आणि शिक्षण यांचे एक उत्तम दर्शन जगाला घडवले. ते अत्यंत दयाळू होते आणि अनेक गरजूंपर्यंत ते पोहोचले. आपल्या प्रत्येक कामातून करमशीभाईंनी प्रेम आणि मानवतेचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला. हीच शिकवण त्यांच्या मनावर अगदी लहानपणीच महात्मा गांधींच्या शिकवणुकीतून कोरली गेली होती. त्यांचा पुरातन भारताच्या संस्कृत शिकवणीवर (ना मनुषित परो धर्म) मानवापेक्षा कोणताही धर्म मोठा असू शकत नाही, यावर पूर्ण विश्वास होता. करमशीभाईंनी त्यांच्या आयुष्यात हे तत्व अगदी कटाक्षाने पाळले आणि अंमलात आणले.

श्री करमशीभाई सोमैया यांचे निधन ९ मे १९९९ रोजी, त्यांच्या ९७ व्या वाढदिवसाच्या एक आठवडा आधी झाले. सोमैया विद्याविहार हे त्यांच्या जिवंत महानतेचे प्रतीक आहे. त्यांची महानता, त्यांचे कार्य आणि दूरदृष्टी यांचे एक प्रतीक म्हणून आपण सोमैया विद्याविहारकडे आज पाहतो.

त्यांचं चरित्र वाचा ऑनलाइन –
पद्माभूषण करमसी जेठाभाई सोमैया यांचे आत्मचरित्र - राजा मंगळवेडेकर.

  • ई-पुस्तक येथे डाउनलोड करा -

डॉ. एस. के. सोमैया

ऊस संशोधन, साखर निर्मिती आणि इथेनॉल तसंच इथेनॉलपासून इतर रसायनं तयार करण्याच्या क्षेत्रामध्ये डॉ. सोमैया यांचं योगदान आहे. १९६०च्या उत्तरार्धात कर्नाटकातील समीरवाडी इथे सुरू करण्याच आलेला साखर कारखाना हे त्यांच्या कंपनीतील योगदानाचं एक प्रतीक आहे. त्याकाळात त्याभागात ऊसाचं अल्प उत्पादन होत असे. डॉ. सोमैया यांनी क.जे.सोमैया इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड अॅग्रीकल्चर रिसर्चची (KIAAR) स्थापना केली आणि त्या भागातल्या शेतक-यांना ऊसाचं उत्पादन करण्याबाबत प्रशिक्षण दिलं. आज, भारतातल्या सर्वोत्तम ऊस उत्पादक विभागांमध्ये उत्तर कर्नाटकाचा नाव घेतलं जातं.

ज्या काळात दिवसाला फक्त दीड हजार टन ऊस गाळपासाठी कारखान्यात यायचा त्या काळात त्यांनी ही क्षमता १० हजार टन करण्याचं स्वप्न पाहिलं. आजही भारतातल्या काही मोजक्याच कारखान्यांमध्ये (समीरवाडी हा त्यापैकी एक) दिवसाला १० हजार टन उसाचं गाळप करण्याची क्षमता आहे.

या भागाला समृद्ध करण्यासाठी डॉ. सोमैया यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना धारवाड इथल्या कृषी विज्ञान विद्यापीठाकडून मानद पीएचडी प्रदान करण्यात आली.

डॉ. सोमैया यांनी आणखी एका अभिनव कल्पनेला जन्म दिला. ज्या काळात मळीचा निचरा करणं ही एक समस्या होती त्याकाळात म्हणजे १९५० मध्ये त्यांनी मळीपासून इथेनॉल निर्मितीला सुरूवात केली. १९६०च्या पूर्वार्धात त्यांनी औद्योगिक रसायनांसाठी इथेनॉलचा कोळशाप्रमाणे वापर करण्याच्या प्रक्रियेचा पाया रचला. आजच्या युगात जेव्हा ऊर्जा आणि पेट्रोकेमिकल्सची किंमत वाढली असताना जग अक्षय ऊर्जेचा गांभिर्याने विचार करू लागलंय. मात्र डॉ. सोमैया यांनी त्याकाळातच याचा विचार करून प्रत्यक्ष कृती केली.

साखर क्षेत्रामध्ये सामाजिक तसंच आर्थिक समृद्धी आणण्याची ताकद आहे यावर त्यांचा गाढा विश्वास होता. ग्रामीण भागातील लोकांचा लाभ होईल यासाठी सतत नवनवीन सामाजिक कार्यक्रम राबवण्यासाठी ते प्रयत्नशील होते. अन्नामधील अ जीवनसत्त्वाच्या अभावामुळे आलेल्या अंधत्वावर मात करण्याचा प्रयत्न करणारा अंकुर हा त्यांचा शेवटचा कार्यक्रम होता. राष्ट्रीय अंध विद्यालय (National Association for Blind) सोबत तसंच विविध साखर कारखान्यांच्या सहकार्याने त्यांनी हा उपक्रम राबवला.

त्यांनी सोमैया ट्रस्टचं नेतृत्व केलं तसंच सोमैया विद्याविहारचे ते उपाध्यक्ष होते. विद्याविहारच्या निर्मितीला चालना देण्याबरोबरच संस्कृतीविहारची संकल्पनाही त्यांनी मांडली. या शैक्षणिक संस्थांमध्ये भारतीय अध्यात्म, धर्म यांची शिकवण देण्याबरोबरच अभ्यासक्रमात मूल्यांचा अंतर्भाव करण्यावर भर दिला जातो. दि क जे सोमैया भारतीय संस्कृती पीठम्, क जे सोमैया इन्स्टिट्यूट ऑफ बुद्धिस्ट स्टडीज, क जे सोमैया जैन सेंटर याचाच भाग आहेत.

या संस्थांच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण पार्श्वभूमी असणा-या लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. व्हॅटिकन सिटीसोबत आंतरधर्मीय संवादांसारख्या कार्यक्रमांचं आयोजन करतानाच कझाकस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांना इस्लाम धर्मावरील चर्चेसाठी आमंत्रण दिलं.

धर्म संसदेसमोर भाषण देण्यासाठी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न इथे गेले असता १ जानेवारी रोजी डॉ. सोमैया यांचं दुःखद निधन झालं.

संस्थापकांनी सुरू केलेल्या कार्याचा वारसा यशस्वीरित्या पुढे नेण्याचं महत्कार्य त्यांनी केलं. त्याचबरोबर गोदावरी आणि सोमैया ट्रस्टचा विस्तार करण्याचं कार्यही त्यांनी केलं.

उद्योगधंदे असोत, शिक्षण, धर्म असो की अध्यात्म, एकात्मिक विकासाची एक दृष्टी त्यांनी त्यांच्यामागे ठेवली आहे. सर्वसमावेशकता हे मूल्य जपणारा आपला वारसा आणि परंपरांचं दर्शनच त्यांच्या या दृष्टीतून होतं.

त्यांनी दिलेली भाषणं ऑनलाइन वाचा –
डॉ शांतीलाल के सोमैया यांची भाषणे - आतील आणि बाहेरील शांतीचा शोधमधील ज्ञान सामायिक

  • ई-पुस्तक येथे डाउनलोड करा -

View: TIMELINE: Timeline

वेळ रेखा

कंपनीचं मूळ हे त्याच्या स्थापनेच्या खूप आधीपासूनच रूजलेलं असतं. या कंपनीच्या बाबतीतही तसंच आहे. क जे सोमैया आणि काठोड कुटुंबिय ( श्रीरामपूरमधील बेलापूर येथील मेसर्स शोभाचंद्र रामनारायण काठोड) यांच्यातील साखर व्यापारातच मूळ दडलेलं आहे. श्री. सोमैया हे कार्यकरी भागीदार होते तर काठोड कुटुंबिय आर्थिक भागीदार होते. ही भागीदारी १९२७मध्ये सुरू झाली.

१९२७-१९६० – सुरूवातीची वर्षे

  • १९२८

    साखर व्यापाराच्या उद्योगात श्री. क जे सोमैया यांनी ८०० रूपयांचं पहिलं उत्पन्न मिळवलं.

  • १९३६

    साखरेच्या व्यापारात यशस्वीरित्या जम बसवल्यानंतर श्री. क जे सोमैया यांनी साखरेचं उत्पादन करण्याचा विचार केला. सुरूवातीला दिवसामागे १०० टन ऊसाचा गाळप करण्यासाठी कारखाना उभारायचं त्यांनी ठरवली. पण शेवटी विचार करून त्यांनी अशी यंत्रणा विकत घेतली ज्यामुळे दिवसाकाठी ४०० टन उसाचा गाळप होऊ शकतो.

    चेकोस्लोव्हाकियाच्या स्कोडा कंपनीकडून साखरेसाठीची यंत्रणा मागवण्यात आली. खरंतर या यंत्रणेच्या खरेदीसाठी मोठी रक्कम लागणार होती. त्यापैकी ७ लाख रूपये काठोड कुटुंबियांकडून उभे करण्यात आले. मात्र त्याच वेळी दुस-या महायुद्धाची ठिणगी पडली. त्यामुळे व्यापार थंडावला. मात्र सुदैवाने ऑर्डर केलेली यंत्रणा दुसरं महायुद्ध सुरू व्हायच्या आधीच मुंबई बंदरात पोहोचली.

    यंत्रसामुग्री बंदरात आल्यानंतर हा माल ताब्यात घेण्यासाठी लागणारे १० हजार रूपयेही श्री क जे सोमैया यांच्याकडे नव्हते. मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. योगायोगाने अगदी त्याचवेळी गोदावरी साखर कारखान्याचे ऋणपत्र (डिबेंचर्स) घेण्यासाठी नेपाळच्या राजांनी पाठवलेला १० हजार रूपयांचा धनादेश आला.

  • १९३९

    १ जून रोजी दि गोदावरी शुगर मिल्सची स्थापना झाली

  • १९४०

    महाराष्ट्रातल्या गोदावरी नदीच्या किनारी साखर कारखाना स्थापन करण्यात आला. आणि तिथून साखरेच्या उत्पादन तसंच विक्रीला सुरूवात झाली.

  • १९४१

    महाराष्ट्रातल्या लक्ष्मीवाडी येथे दुसरा साखर कारखाना सुरू करण्यात आला. कालव्याच्या पाण्याचा सिंचनासाठी वापर करता येऊ शकतो हे शेतक-यांना पटवून देण्यात श्री. क जे सोमैया यांना यश आलं.

  • १९४७

    महाराष्ट्रातल्या साकरवाडी इथे दीड हजार गॅलनची क्षमता असणारी भट्टी सुरू करण्यात आली.

  • १९५०

    उत्तरप्रदेशातल्या कप्तानगंज इथली भट्टी विकत घेण्यात आली.

  • १९५१

    पंडित नेहरूंच्या कॅबिनेटमध्ये असणा-या केंद्रीय कृषीमंत्री श्री कन्हैय्यालाल माणिकलाल मुन्शी यांनी श्री. क जे सोमैया यांना मध्य प्रदेशात येण्यासाठी आमंत्रण दिलं. या भेटीनंतर कंपनीने नर्मदेच्या काठी असलेली हजारो एकर जमीन शेतीसाठी विकत घेतली.

  • १९६०

    कंपनीकडून महाराष्ट्रात तसंच १९६०च्या उत्तरार्धात उत्तरप्रदेशातल्या बाराबंकी इथे इथेनॉलचं उत्पादन सुरू झालं. त्याचबरोबर रसायननिर्मितीमध्ये इथेनॉलचा इंधन म्हणून वापर करण्याचा पाया कंपनीने भारतात रचला.

१९६१-१९९२: कंपनीकरण

  • १९६१

    गोदावरीमधून इथेनॉल आणि रसायने विभाग वेगळे करण्यात आले. महाराष्ट्रात सोमैया ऑरगॅनो-केमिकल्स लिमिटेड (SOCL) आणि उत्तर प्रदेशात सोमैया ऑरगॅनिक केमिकल्स लिमिटेड (SOIL) या दोन कंपन्या तयार करण्यात आल्या. काही करणाने साखर क्षेत्रात काही वाईट झालं तर त्याची झळ रसायनांच्या क्षेत्राला बसू नये यासाठीच दोन वेगवेगळ्या कंपन्या बनवण्यात आल्या.

  • १९६२

    साकरवाडी साखर कारखान्याला परवानगी मिळाली आणि पहिला गाळप हंगाम १९६३ मध्ये सुरू झाला. कंपनीने पुन्हा एकदा शेतीकडे आपला मोर्चा वळवला. ऊस लागवडीसाठी १६ हजार एकर शेतजमीन विकत घेत कंपनी जगातली सर्वात किफायतशीर कंपनी बनली.

  • १९६३

    १७ एप्रिलपासून भारत सरकारने साखरची किंमत आणि वितरणावर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतला. उत्तर प्रदेशासहित इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात साखरेची किंमत कमी ठेवण्यात आली. साखर क्षेत्रामधऊन अनेक आंदोलनं होऊनही महाराष्ट्रातली परिस्थिती बदलली नाही.

  • १९६५

    ऊसाला होणा-या पाणीपुरवठ्यामध्ये २५ टक्क्यांनी कपात करून ते पाणी इतर धान्यांसाठी वळवण्याचा निर्णय ऑक्टोबर महिन्यात घेण्यात आला.

  • १९६६

    पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी देशात जमीनधारणेचा कायदा ( लँड सीलिंग अॅक्ट) लागू केला. सरकारच्या या धोरणामुळे कंपनीला त्यांच्या मालकीच्या ऊसाच्या शेतांवर पाणी सोडायला लागलं. गोदावरी साखर कारखान्याने पंतप्रधान नेहरूंना लेखी निवेदन दिलं.

    २६ एप्रिल रोजी दिल्लीत अखिल भारतीय साखर उत्पादकांची परिषद पार पडली. ऊस उत्पादनातील तंत्रज्ञानामध्ये श्री. क जे सोमैया यांनी दिलेल्या योगदानाचं तसेच आमच्या कंपनीच्या शेती अधिका-यांचं कौतुक तत्कालीन कृषी मंत्री अण्णासाहेब शिंदेंनी या परिषदेत केलं.

    महाराष्ट्रात सहकार चळवळीला सुरूवात झाली. खाजगी साखर उत्पादकांना हद्दपार करण्यासाठीच राजकारणाने साखरेत शिरकाव केला होता.

  • १९७०

    अशा सगळ्या परिस्थितीत कारखानाच्या कक्षा रूंदावण्यासाठी कर्नाटक ही चांगली जागा असल्याचं गोदावरीने ओळखलं. सीमेपलिकडे असल्यामुळे मुबलक पाणीपुरवठा, स्वस्त दरात ऊस, साखरेची उपलब्धी अशा सगळ्या फायद्यांबरोबरच एक चांगली गोष्ट होती आणि ती म्हणजे या भागात सहकार लॉबी तितकी सशक्त नव्हती. मात्र या भागात ऊसाची लागवडच होत नसे. त्यामुळेच तिथल्या शेतक-यांना ऊस लागवड शिकवण्यासाठी कर्नाटक इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड अॅग्रीकल्चरल रिसर्च (KIAAR) स्थापन करण्यात आली. सुरूवातीच्या काळात गोव्यामधून ऊस विकत घेतला जायचा.

  • १९७१

    ६ जूनला मैसूरचे राज्यपाल माननीय धरम वीर यांच्या हस्ते मैसूरमध्ये साखर कारखान्याचा शिलान्यास करण्यात आला.

  • १९७२

    कर्नाटकातल्या समीरवाडीमध्ये कारखाना उभारण्यात आला आणि साखर उत्पादनाला सुरूवात झाली.

  • १९८४

    समीरवाडीमध्ये इथेनॉलच्या उत्पादनाला गोदावरीने सुरूवात केली.

    महाराष्ट्रातील दोन्ही साखर कारखाने कंपनीच्या अंतर्गत आहेत.

  • १९९२

    महाराष्ट्रातल्या साकरवाडी इथे इथाइल अॅसिटेटचा प्लांट उभारण्यात आला.

१९९२-२००६: उदारीकरण

  • १९९२

    उदारीकरणामुळे रसायनांसहित सर्व आयात मालावर कर बसवण्यात आला.

  • १९९३

    मळीवरचे निर्बंध उठवण्यात आले. कच्च्या मालाच्या वाढलेल्या किंमती आणि उत्पादित मालाला मिळणारा कमी भाव अशा दुहेरी संकटाला कंपनीला तोंड द्यावं लागलं.

    धोरणात्मक विचार करत गुणवत्ता, प्रमाण आणि किंमत या कसोट्यांवर जगाशी स्पर्धा करता यावी यासाठी कंपनीने संशोधन क्षमता वाढवली. याशिवाय रसायनांची निर्यात करत जागतिक बाजारपेठेत शिरकाव केला.

    मूल्यवर्धित रसायनांच्या निर्मितीसाठी कंपनीचा जागतिक बँकेकडून गौरव करण्यात आला. त्यामुळे संशोधन क्षेत्राला चालना मिळाली.

  • १९९४

    अक्षमांना (अपंगांसाठी) रोजगार उपलब्ध करून देण्याची असामान्य कामगिरी केल्याबद्दल कंपनीला राज्य सरकारचा पुरस्कार देण्यात आला.

  • १९९७

    अक्षमांना (अपंगांसाठी) रोजगार उपलब्ध करून देण्याची असामान्य कामगिरी केल्याबद्दल कंपनीला राष्ट्रीय पुरस्कारही देण्यात आला.

  • २०००

    राष्ट्रपती के. आर. नारायणन् यांच्या हस्ते श्री. क जे सोमैया यांना २६ जानेवारी २००० रोजी मानाचा पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

  • २००१

    गरजू होतकरू विद्यार्थ्यांसाठी हेल्प अ चाइल्ड टू स्टडी हा उपक्रम सुरू करण्यात आला. हुशार, अभ्यास करण्याची इच्छा बाळगणा-या पण आर्थिक विवंचेनेमुळे उच्च शिक्षण घेऊन शकणारी मुले आणि अशा मुलांना मदत करू इच्छिणारे यांना एकत्र आणण्याचं काम या उपक्रमाने केलं.

    १ एप्रिल रोजी सोमैया ऑरगॅनो केमिकल्स लिमिटेड (SOCL) आणि गोदावरी साखर कारखाना मर्या. (GSML) एकमेकांमध्ये विलीन झाले. यामुळे साखर, इथेनॉल आणि इथेनॉलशी संबंधित रसायनं ही एका छत्राखाली आली.

  • २००२

    २४ मेगावॅटची क्षमता असणा-या ऊर्जा प्रकल्प समीरवाडी इथे सुरू करण्यात आला. या प्रकल्पाच्या माध्यमातून हवामान बदलाचा सामना करत हरित ऊर्जा निर्मिती केल्यामुळे कंपनीला कार्बन क्रेडिट्स मिळाली. पर्यावरणाच्या रक्षणासाठी कंपनीला युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटचं (USAID) अनुदान मिळालं. त्याकाळात ऊस कारखाने हाय प्रेशर बॉयलर्सच्या माध्यमातून वीज निर्यात करण्यास उत्सुक नसायचे. या क्षेत्रात गोदावरी आद्यप्रवर्तक होती आणि म्हणूनच अनुदानासाठी कंपनीची निवड करण्यात आली.

  • २००४

    क्रोटोनाल्डिहाइडच्या निर्मितीला कंपनीने सुरूवात केली. हे खास प्रकारचं रसायन चीन आणि जर्मनीत निर्यात होऊ लागलं.

  • २००५

    व्यापार वृद्धीकरणासाठी GSML कंपनीने महाराष्ट्रातील दोन साखर कारखाने आणि एक इथेनॉल डिस्टीलरी भाड्याने घेतली.

  • २००६

    कंपनीने इथाईल अॅसिटेटच्या उत्पादनाची क्षमता १२ हजार मेट्रिक टनांवरून ३० हजार टेरापास्कल इतकी वाढवली.

    कंपनीने सोमैया ग्रामीण विकास केंद्राच्या माध्यमातून हेल्प अ चाइल्ड, जलसंवर्धन, कृषीविकास, कृषी संशोधन, आरोग्यविषयक उपक्रम, पंचमुखी उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, स्वच्छता आणि पंचायत प्रशिक्षणसारखे कार्यक्रम घेतले. या योगदानासाठी कंपनीला इंटरनॅशनल चेम्बर ऑफ कॉमर्सकडून २००५-०६ चा कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

    अपंग (NASEOH) समान संधी राष्ट्रीय सोसायटी, मुंबई २००७ अपंग पुरस्कार थकबाकी नियोक्ता, गोदावरी बायोरेफीनेरीएसलि निवडले.

२००६-२०१०

  • २००६

    साखर निर्यातीवर तात्पुरत्या बंदीमुळे साखरेच्या किंमती घसरल्या. यावर कंपनीकडून केन प्राइस डिफरन्सिएशनचा तोडगा काढण्यात आला. इतिहासात प्रथमच कंपनी आणि साखर क्षेत्रात ऊसाची किंमत ही पुनर्प्राप्तीशी (recovery) जोडण्यात आली होती. यामुळे उत्पादनावर आधारित ऊसाची किंमत ठरवण्याची जुनी पद्धत मोडीत निघाली. गोदावरी शुगर मिल्स लिमिटेडने कच्चा साखरेची निर्यात करण्याची प्रथा पाडली.

  • २००७

    गोदावरी साखर कारखान्याने (GSML) २१.४८ लाख टन ऊसाचा गाळप करत नवा विक्रम घडवला. सर्वाधिक ऊस गाळप केल्यामुळे कंपनीचा सिस्टा म्हणजे साउथ इंडियन शुगर अँड शुगर केन टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशनकडून गौरव करण्यात आला.

    इथेनॉलच्या एकूण उत्पादनाच्या ५ टक्के मिश्रण इंधन म्हणून वापरण्याचा आदेश सरकारने दिला.

    नॅशनल सोसायटी फॉर इक्वल अपॉर्चुनिटीज फॉर दी हँडिकॅप्ड (NASEOH) कडून गोदावरीला २००७चा दि आउटस्टँडिंग एम्प्लॉयर ऑफ दि डिसेबल्ड हा पुरस्कार मिळाला.

  • २००९

    कंपनीचा विस्तार करण्यासाठी तसंच युरोप आणि अमेरिकेच्या बाजारात शिरकाव करण्यासाठी नेदरलँडस्थित कयुगा इन्व्हेस्टमेंट्स बीव्ही आणि अमेरिकास्थित गोदावरी बायोरिफायनरीज एन्कार्पोरेशन या दोन कंपन्या एकत्र आल्या.

    महाराष्ट्रातल्या साकरवाडी इथलं अल्डिहाइडची उत्पादन क्षमता वाढून ७२ केएलपीडी इतकी झाली.

    २००९मध्ये सहव्यवस्थापकीय संचालक समीर सोमैया यांची इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली.

    डिसेंबर २००९मध्ये समीरवाडी इथे गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेडने २०० केएलपीडी क्षमतेचा डिस्टिलरी प्लांट तसंच १०० केएलपीडी इनए (Extra Natural Alcohol) प्लांट सुरू केला.

    तीन वर्षात कंपनीने इथाइल अॅसिटेटचं उत्पादन ३० हजार मेट्रिक टनांवरून ६० हजार मेट्रिक टनांवर नेलं.

    साकरवाडी इथल्या रासायनिक प्लांटला आयएसओ ९००१ :२००८ प्रमाणपत्र मिळालं.

२०१०-२०१७

  • २०११

    गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेडकडून साकरवाडी इथल्या रासायनिक विभागाला संपूर्णपणे निर्यातभिमुख विभागात बदलण्यात आलं.

    कर्नाटकतल्या समीरवाडी इथल्या गोदावरीच्या विभागाने २१.५६ मेगावॅटची वीजनिर्मिती करणारा आणखी एक ऊर्जाप्रकल्प सुरू केला. त्यामुळे समीरवाडी इथली एकूण ऊर्जानिर्मितीची क्षमता ४५.४ मेगावॅट इतकी झाली.

  • २०१२

    जीएफएसआयने घालून दिलेल्या नियमांमध्ये काम केल्याने डिसेंबरमध्ये समीरवाडी इथल्या साखर कारखान्याला एफएसएससी २२००० प्रमाणपत्र मिळालं.

  • २०१३

    ऊसापासून मेण बनवण्याचा प्रकल्प कंपनीकडून सुरू करण्यात आला.

    मार्च महिन्यात ऑल इंडिया लिक्विड बल्क इम्पोर्टर्स अँड एक्सपोर्टर्स असोसिएशनकडून (एलबेला) देण्यात येणारा हायेस्ट लिक्विड बल्क एक्सपोर्ट्स ऑफ स्पेशलाइज्ड केमिकल्स हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

    ऑक्टोबरमध्ये कंपनीकडून पाण्यावरील जैविक प्रक्रियेचा प्रकल्प (बायोलॉजिकल वॉटर ट्रिटमेंट प्लांट) सुरू करण्यात आला. या प्रकल्पामुळे सांडपाण्याचा पुनर्वापर केला गेला. त्यामुळे नवीन पाण्याचा वापर ४० टक्क्यांनी कमी झाला.

    १० एप्रिलला गोदावरीला असामान्य निर्यात कामगिरीसाठी २००९-१० चा CHEMEXCIL कडून दिला जाणारा त्रिशूल हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

    २०१३मध्ये हिंदुस्तान कोकाकोला बेव्हरेजेस प्रा. लि. कडून सप्लायर परफॉर्मन्स सिल्व्हर अॅवॉर्ड कंपनीला मिळाला.

    जिल्हापातळीवर सर्वात मोठा निर्यातदार बनल्यामुळे बागलकोट जिल्ह्यासाठी फेडरेशन ऑफ कर्नाटक चेम्बर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने (FKCCI) गोदावरीला एक्स्पोर्ट एक्सलन्स अॅवॉर्ड मिळाला.

    सिस्टा म्हणजे साउथ इंडियन शुगर अँड शुगर केन टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशनने २०१३-१४मध्ये गोदावरीला कर्नाटकातील बेस्ट डिस्टीलरीसाठी गोल्डन अॅवॉर्ड प्रदान केला.

  • २०१४

    ऑक्टोबरमध्ये गोदावरीकडून जीवना हा ब्रँड लाँच करण्यात आला. जीवनाकडून साखर आणि मीठ बाजारात उपलब्ध करण्यात आलं.

    गोदावरीकडून फ्लेवर्ड तसंच सुगंधी रसायनं, एमपीओच्या निर्मितीला सुरूवात झाला. हे रसायन जागतिक बाजारपेठेत निर्यातीसाठी पाठवण्यात येणार आहे.

    गोदावरीमध्ये प्रायव्हेट इक्विटीची गुंतवणूक झाली.

    महाराष्ट्रातल्या साकरवाडीमध्ये गोदावरीचा १.३ ब्युटेन डायॉल प्लांट उभारण्यात आला.

  • २०१५

    1. आंतरराष्ट्रीय स्वाद आणि सुगंध उद्योगाच्या उच्च गुणवत्तेची मागणी पूर्ण करण्यासाठी एमपीओ प्लांटचा विस्तार

    2. आंतरराष्ट्रीय वैयक्तिक देखभाल उद्योगाच्या गरजा भागविण्यासाठी 1,3 बीजी प्लांटचा विस्तार.

  • २०१६

    भारतीय इंधन बाजार, स्वच्छता बाजार आणि वैयक्तिक देखभाल उद्योगाची मागणी पूर्ण करण्यासाठी इथेनॉल

  • २०१७

    संसाधने व पुनर्नवीकरणीय वीजनिर्मितीसाठी ज्वलन बॉयलर कार्यान्वित केले.