संसाधन शाश्वतता
जैव अक्षय कच्च्या मालाचा वापर करत उत्पादनांची निर्मिती करणे आणि या कच्च्या मालाचा पुरेपूर वापर करण्यासाठी मूल्यवर्धनावर भर देणे इथूनच आमच्या शाश्वततेबाबतच्या ध्येयाची सुरूवात होते. अधिकाधिक उत्पादननिर्मिती करत आर्थिक तर कमीतकमी संसाधन वापरत कचरा आणि कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण आणत पर्यावरणीय स्थैर्य टिकवून ठेवण्यासाठी अधिक कार्यक्षम उत्पादन प्रक्रियांच्या योजना आखत आम्ही याची सुरूवात केली आहे. मिळालेलं प्रत्येक को-प्रॉडक्ट हे दुस-या उत्पादनासाठी फीडस्टॉक म्हणून वापरलं जातं. या आशा व्हॅल्यू चेनच्या मार्फतच आम्ही मूल्यवर्धित उत्पादनं निर्माण करत आहोत.
कच-यातून मूल्यप्राप्ती
उत्पादन प्रक्रियेतून निर्माण होणा-या सांडपाण्याकडे टाकाऊ दृष्टीकोनातून न बघता त्याचा संसाधन म्हणून वापर करणं हाच आमच्यासाठी शाश्वततेकडे जाण्याचा मार्ग आहे.
१९३९मध्ये उभारण्यात आलेल्या आमच्या प्लांट्सने विकास आणि गुंतवणूकीच्या विविध टप्पे पार करत परिवर्तन केलं आहे.
पूर्वी आम्ही फक्त साखरेचं उत्पादन करायचो आणि काकवी हे तेव्हा कच-यासमान होतं. इथेनॉल आणि इथेनॉलवर आधारित रसायनांच्या निर्मितीसाठी काकवीचा फीडस्टॉक म्हणून वापर करण्याची सुरूवात आमच्या कंपनीने केली. पुढल्या काळात फर्मेंटेशन प्रक्रियेतील टाकाऊ पदार्थाचा बायोगॅसनिर्मितीसाठी विचार होऊ लागला. त्याशिवाय त्यातील कचरा आणि इतर टाकाऊ वस्तूंना जमिनीत पुरून त्यापासून कंपोस्टनिर्मिती होऊ लागली. या कंपोस्टला आम्ही भूमिलाभ असं म्हणतो.
त्यानंतर आम्ही ऊसाच्या चिपाडांचा पुनर्वापर करण्याचा पाया रचला. ऊर्जा निर्मितीसाठी फीडस्टॉक म्हणून वापर करत असल्यामुळे हरितगृह वायू उत्सर्जनावर आम्ही मर्यादा घालू शकलो. यासाठीच आम्हाला युएसएआयडीचं अनुदानही मिळालं आहे.
कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये आमचे प्लांट्स आहेत. ऊसापासून साखर बनवताना तसंच ऊर्जा, इथेनॉल, जैवखतं आणि विशेष प्रकारची रसायनं यांसारखी इतर मूल्यवर्धित उत्पादनं निर्माण करण्यासाठी पुनर्वापर योग्य संसाधनांचा वापर आम्ही करतो.
कमीतकमी वाफेचा वापर करत फर्मेंटेड वॉशमधून अधिकाधिक अल्कोहोल आणि इएनए मिळवण्याकरता आमच्या डिस्टीलरीज तयार करण्यात आल्या आहेत. अपु-या रिसायक्लिंग वॉशमुळे सांडपाण्याचं प्रमाण कमी होतं तसंच संपूर्ण प्रक्रियेसाठी कमी पाणी लागतं.
अत्याधुनिक पद्धतीने सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचं तंत्रज्ञान आम्हाला अवगत आहे. अशा प्रकारे सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणं हे आमच्या शून्य द्रव उत्सर्जन व्यवस्थेत आम्ही अंतर्भूत केलं आहे, जेणेकरून सांडपाणी बाहेर सोडलं जात नाही आणि पर्यावरणाचं रक्षण होतं. बायोलॉजिकल ट्रीटमेंट प्लांट आणि कंडेन्सिंग पॉलिशिंग युनिटमध्ये स्पेंट लीजवर प्रक्रिया होते तसंच द्रवीकरणाची प्रक्रियाही होते. प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर केला जातो. त्यामुळे फ्रेश वॉटरच्या वापरात घट होते.
केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाने घालून दिलेल्या नियमांनुसार आमचं कामकाज सुरू आहे. त्यामुळेच बायोगॅसच्या माध्यमातून सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणं आणि नंतर साखर कारखान्यातून आलेल्या बायोकंपोस्टसाठी त्याचा वापर करत शून्य द्रव उत्सर्जनाचा अवलंब आम्ही करतो.
जल शाश्वतता
पाणी हे अमूल्य आहे आणि त्याचा काळजीपूर्वक वापर केला पाहिजे याची आम्हाला जाणीव आहे. पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करत आम्ही आमच्या फ्रेश वॉटर वापरात कपात केली आहे.
ऊस म्हणजे ७० टक्के पाणी. या ७० टक्के पाण्याकडे आम्ही एक संसाधन म्हणून बघतो आणि आमच्या विविध प्रक्रियांमध्ये त्याचा वापर करतो. यामुळेच नदीतून मिळणा-या नैसर्गिक पाण्याचा वापर मर्यादित ठेवणं आम्हाला शक्य होतं. एक टन ऊसापासून साधारण ४०० क्युबिक सेंटिमीटरपेक्षा अधिक पाणी मिळतं. हेच पाणी आम्ही आमच्या इतर प्रक्रियांमध्ये वापरतो.
कमीतकमी वाफेचा वापर करत फर्मेंटेड वॉशमधून अधिकाधिक अल्कोहोल आणि इएनए मिळवण्याकरता आमच्या डिस्टीलरीज तयार करण्यात आल्या आहेत. अपु-या रिसायक्लिंग वॉशमुळे सांडपाण्याचं प्रमाण कमी होतं तसंच संपूर्ण प्रक्रियेसाठी कमी पाणी लागतं.
अत्याधुनिक पद्धतीने सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचं तंत्रज्ञान आम्हाला अवगत आहे. अशा प्रकारे सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणं हे आमच्या शून्य द्रव उत्सर्जन व्यवस्थेत आम्ही अंतर्भूत केलं आहे, जेणेकरून सांडपाणी बाहेर सोडलं जात नाही आणि पर्यावरणाचं रक्षण होतं. बायोलॉजिकल ट्रीटमेंट प्लांट आणि कंडेन्सिंग पॉलिशिंग युनिटमध्ये स्पेंट लीजवर प्रक्रिया होते तसंच द्रवीकरणाची प्रक्रियाही होते. प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर केला जातो. त्यामुळे फ्रेश वॉटरच्या वापरात घट होते.
ऊसाच्या लागवडीमध्ये पाण्याच्या नेमक्या वापराची आम्हाला जाण आहे. पाण्याच्या वापराचा अभ्यास करूनच पाण्याभोवती फिरणारी आर्थिक गणितं सुटू शकतात. त्यामुळेच कच-याचा वापर करून पाणी जिरवणे, नांगर सिंचन, एक आड एक सिंचन पद्धती, ठिबक सिंचन, आंतरपिकं अशा पद्धतींचा अवलंब करत ही गणितं सुटू शकतात. ऊसाच्या पारंपरिक लागवडीऐवजी ऊसाच्या बियांचं प्रत्यारोपण केल्याने ३० ते ४५ दिवसांच्या पाणीपुरवठ्याची बचत होते. पिकांवर सिलिकायुक्त केओलिनची फवारणी केल्यामुळे रोपामधून होणा-या बाष्पीभवनाला काही प्रमाणात आळा घालण्यात येतो. वाहत्या पद्धतीऐवजी ठिबंक सिंचनाचा अवलंब केल्यास ४० टक्के पाण्याची बचत होत असल्याचंही आमच्या लक्षात आलं आहे.
ऊर्जा संवर्धन
उज्जवल भविष्यासाठी ऊर्जा संवर्धन करणं आणि त्यासाठी योग्य ती पावलं उचलणं यावर आमचा विश्वास आहे.
स्वतंत्र ऊर्जा निर्मिती करणा-यांकडून वीज विकत घेतली जाईल हे धोरण भारत सरकारने जाहिर केलं. त्यानंतर आम्ही ऊसाच्या चिपाडांपासून वीजनिर्मितीला सुरूवात केली. साखर कारखान्याला असणा-या गरजेपेक्षा जास्त वीजेची विक्री करण्यासही आम्ही सुरूवात केली.
याआधी आम्ही फक्त आमच्या गरजेपुरती वीज निर्माण करत होतो. मात्र आता उपलब्ध संसाधनांचा वापर करत आम्ही १०० दशलक्ष युनिट इतकी ज्यादी वीज पॉवर ग्रीडला निर्यात करतो. ही वीज नजिकच्या गावांना पुरवली जाते. या प्रक्रियेमध्ये कार्बन उत्सर्जन कमी होतं. त्यामुळेच आम्हाला युएनएफसीसीकडून कार्बन क्रेडिट्स मिळाली आहेत.
निरोगी पृथ्वी
हे जग निरोगी आणि समृद्ध असावं. हे तेव्हाच होईल जेव्हा आपल्या प्रत्यक्ष कृती शाश्वत असतील आणि आपली पदचिन्हं सौम्य असतील. आपली संसाधनं ही जमिनीतून येतात. त्यामुळेच आपण ही जमीन, ही माती, पृथ्वी निरोगी राहिल याची काळजी घेतली पाहिजे. अनेकदा शेतकरी ठरवून दिलेल्या मापानुसार, शिफारशींनुसार खतांचा वापर करतात. ही खतं वापरताना शेताला नेमकी कशाची गरज आहे याची चाचपणी केली जात नाही. आमचा दृष्टीकोन स्पष्ट आहे. मातीची चाचणी करा, शेतक-याला काय पेरायचं आहे ते समजून घ्या आणि त्याच्या गरजेनुसार त्याला पर्याय उपलब्ध करून द्या. असं केल्याने त्या शेतक-याला अधिकाधिक उत्पादन तर मिळतंच पण त्याशिवाय ती माती मोठ्या काळासाठी सुपीक आणि निरोगी राहते.
सेंद्रीय कच्च्या मालाच्या वापराला, सोयाबिनसारख्या आंतरपिकांच्या लागवडीला आम्ही प्रोत्साहन देतो. याशिवाय इतरही पर्याय उपलब्ध करून देत ही माती निरोगी ठेवण्याचं ध्येय शेतकरी गाठतील याची काळजीही घेतली जाते.