सीएसआर धोरण

गोदावरी बायोरेफीनेरीस सीएसआर लिमिटेड धोरण

२००९ साली गोदावरी साखर मिल लिमिटेड पासून गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेड कंपनी (GBL) वेगळी झाली होती. संस्थापक दिवंगत श्री करमशी जेठाभाई सोमैया (पद्मभूषण) यांनी गोदावरी साखर मिल लिमिटेड कंपनीची स्थापना केली होती, आणि त्यांचे पुत्र डाँ. शांतीलाल करमशी सोमैया यांनी १९३९ मध्ये आणि सात दशकं भारतीय औद्योगिक विकासात योगदान दिले. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, श्री समीर एस सोमैया आणि त्यांच्या व्यावसायिक संघ प्रेरक यांच्या नेतृत्वाखाली ही कंपनी एकत्रिकृत साखर बायोरिफायनरी कंपनी उत्कृष्टरित्या चालत आहे. तर भारतातील ५०० साखर कारखान्यांमध्ये साखर बायोरिफायनरीज कंपनी सर्वाधिक साखर उत्पादन करणा-या तीन कंपनींपैकी एक आहे. दरम्यान कंपनी मद्यार्क उत्पादनात अव्वल असून मद्यार्क आधारित रसायनांच्या उत्पादनात पहिले संशोथक म्हणून कंपनीला मानलं जातं.

भारतात महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेड कंपनीची स्थापना करण्यात आली असून साखर, वीज, मद्यार्क औद्योगिकीकरण, जड सेंद्रीय रसायन, विशेष रसायन, जैव-खत आणि कृषी संशोधन अशा विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे. पुनर्वापरयोग्य संसाधनमध्ये तब्बल २० उत्पादनांचं उत्पादक केले जाते. ज्यामुळे ऊस पासून साखर त्यानंतर वीज, इथेनॉल, जैव-रासायनिक खते इत्यादी अशी अशी मूल्यवर्धित उत्पादन करणारी कंपनीचं नाव आहे.

कॉपरेट क्षेत्रात सामाजिक जाणीव असलेल्या गोदावरी बायोरिफायनरीज कंपनीची स्थापना झाल्यापासून समुदायाच्या विकासाच्या दिशेनं लक्षणीय योगदान दिले आहे. सामाजिक विकास याच दृष्टीकोणातून कंपनीने अथक प्रयत्न केले आहेत. समाजातील सर्वात वंचित घटकांचा विकास याला अनुसरुनच मागास ग्रामीण भाग मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही विशेषतः प्रयत्न केले आहेत. त्यासाठी शिक्षण, आरोग्य, नोकरी, कौशल्य आणि शक्ती यासारखे संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत.

प्रामुख्याने कार्यक्षेत्राच्या गावाचा विकास याकडे सर्वाधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले. सामाजकि विकाससंदर्भातील उपक्रम राबवून उच्च शिक्षण, आरोग्याबाबत जनजागृती, नौकरी, पर्यावरण आणि वन्य जीव संरक्षण, शाळेचे बांधकाम आणि सामाजिक विकास या सारखे उपक्रम राबविले.

गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेड कंपनीच्या वतीने राबवण्यात येणारे सामाजिक उपक्रमाचा लाभ कार्यक्षेत्राच्या गावातील लोकांना होतो का याविषयी खात्री करुन घेण्यात येते. विशेषतः सीएसआर अंतर्गत राबवण्यात येणा-या उपक्रमाचा लाभ गरिबातील गरिबापर्यंत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या होत असल्याची खात्री घेतो.

कंपनीमध्ये काम करणाऱ्या समुदायाची प्राथमिक गरज ही आर्थिक स्वातंत्र्य आहे. समुदायाला कौशल्यांची आणि त्या कौशल्यांच्या व्यवसायीकरणाची गरज आहे, हे जाणून त्यासाठी आर्थिक सुविधा पुरवण्याचे गोदावरी बायोरिफायनरी लिमिटेडने ठरवले. जबाबदार व्यावसायिक संस्था म्हणून संस्थेने पुढाकार घेत त्यांना व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण तसेच आरोग्य व्यवस्था आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे.

कंपनी नियम २०१३ आणि (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी धोरण) नियम २०१४ अंतर्गत कलम १३५ अन्वये गोदावरी बायोरिफानरीज कंपनीने २४ मार्च २०१४ ला संचालक मंडळाची बैठकीत कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समिती स्थापन केली. श्री बी आर बरवाले, डॉ के व्ही राघवन, श्री पॉल झोर्नर, संचालक आणि श्रीमती अमृता एस सोमैया यांनी निर्णय आणि अनुसूची सातवा कायदा अंतर्गत निर्णय तसेच सीएसआर अंतर्गत प्रकल्प व कार्यक्रमाचे अंमलबजावणीसह देखरेख करण्याचे काम सोपविले.

उद्दिष्टे

आर्थिकदृष्टी, सामाजिक आणि पर्यावरणाच्या दृष्टीने निरंतर रीत्या कार्य करण्याचे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीची मुख्य जबाबदारी आहे. खातेधारकांची जाणीव लक्षात घेवून गरजेचं आहे.

समाजातील वंचित आणि आर्थिकदृष्टी दुर्बल घटकांना मदतीचा हात देवून त्यांच्या विकास करण्यासाठी योगदान देण्याचा गोदावरी बायोरिफायनरीज कंपनीच्या सीएसआर धोरणाचा मुख्य उद्देश आहे.

सीएसआर प्रकल्प अंतर्गत काही केंद्रीत भाग
  • शिक्षण जनजागृती
  • लिंग समानता आणि महिला सक्षमीकरण प्रसार
  • बालमृत्यू सारखे घटनांवर नियंत्रण आणि माता आरोग्यामध्ये सुधारणा
  • इम्युनोडेफिशियन्सी व्हायरसवर मात, डेफिशियन्सी सिन्ड्रोम संपादित करणे आणि मलेरिया व इतर रोगावर मात करणे.
  • पर्यावरणाचे निरंतराबाबत खात्री करणे
  • राष्ट्रीय वारसा जपणे
  • पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीत योगदान
  • ग्रामीण विकास योजना
मुख्य भागात लक्ष केंद्रीत करणे
शिक्षण जाहिरात
  • मुलांनी शैक्षणिक सवलत पुरवणं प्रकल्प – शिष्यवृत्ती, संगणक, पुस्तकं इत्यादी शैक्षणिक सवलत प्रदान करण्याचा उद्देश. (www.helpachild.org.in)
  • पूर्व प्राथमिक शाळा (अंगणवाडी केंद्र)
  • ग्रामीण कर्नाटक आणि महाराष्ट्रातील कन्नाडी, मराठी आणि इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना मदत करणे.
  • शालेय ग्रंथालयात पुस्तकांची देणगी
  • महिला शिक्षणाला अनुसरुन प्रोढ शिक्षणाचा प्रसार
  • शाळेत क्वीज कॉम्पिटिशनचे आयोजन.
  • पंचायत सदस्यांसाठी परिसंवादाचे आयोजन.
  • दंत चिकित्सेवर व्याख्यान
  • ऊस उत्पादक शेतक-यांसाठी शिक्षण दौरा...यादरम्यान विविध संशोधन केंद्रे आणि कृषी विद्यापीठे इत्यादी ठिकाणी भेट देणे.

लिंग समानता आणि महिला सक्षमीकरण
  • दररोज शिलाई काम शिक्षणाचा तास
  • तयारी गांडूळ खतांसाठी
  • बेकरी प्रशिक्षण
  • झाडे लावण्याचा तास
  • कृती प्रकलप- स्थानिक पातळीवर उपलब्ध कापूसमध्ये बॅग बनवण्याचे काम.
  • महिला कायदा जनजागृती कार्यक्रम
  • अन्न आणि पोषण जनजागृती कार्यक्रम

बालमृत्यू सारखे घटनांवर नियंत्रण आणि माता आरोग्यामध्ये सुधारणा
  • अंकूर प्रकल्प – तरुण मुलांमध्ये अंधतत्वावर प्रतिबंध
  • राष्ट्रीय पल्स पोलीओ कार्यक्रमात सहभाग.
  • दुभंगलेले ओठांवर स्क्रिनिंग आणि ऑपरेशन शिबिरे.
  • हिपॅटायटीस बी लसीकरण शिबिरे.

इम्युनोडेफिशियन्सी व्हायरसवर मात, डेफिशियन्सी सिन्ड्रोम संपादित करणे आणि मलेरिया व इतर रोगावर मात करणे.
  • एयआयव्ही/एड्स आणि टीबी जनजागृती शिबिरे
  • नियमित अनेकत्व निदान वैद्यकीय शिबिरांचे आयोजन.
  • नियमित मोतीबिंदू ऑपरेशनचे आयोजन.
  • नियमित शालेय विद्यार्थ्यांची वैदकीय तपासणी शिबिरे.
  • नियमित योगा शिबिरे
  • गंभीर / जुनाट रोगांवर आरोग्य जनजागृती महिमेचे आयोजन.
  • रक्तदान शिबिरे
  • सुईदाब शिबिरे

पर्यावरणाचे निरंतराबाबत खात्री करणे
  • सोरवर – १५ एकर पिण्याची पाणी टाकीचे बांधकाम आणि जमिनीवरही पाणी वाढवण्यासाठी प्रवृत्त
  • धंदेली वन्यजीव विभागातील वाघ वाचवण्यासाठी शिकारविरोधी संच.
  • म्हैसूर प्राणीसंग्रहालयात पशु दत्तक
  • दुष्काळ दरम्यान गोशाळ्याचं उद्घाटन
  • पाऊल आणि तोंड रोग/ बैल जोडी प्रदर्शन
  • कुत्र्यांचं प्रदर्शन – भारतीय मुढोल नीच प्रजाती कुत्र्यांचा प्रसार

राष्ट्रीय वारसा जपणे
  • राज्यस्तरीय कुवेम्पू आणि क जे सोमैया जन्मशताब्दी उत्सवाचे आयोजन
  • नियमित भजन स्पर्ध्याचे आयोजन.
  • रंगोली स्पर्धा आणि प्रशिक्षण
  • लोक वाद्य – डोलू आणि करडी वाद्य स्पर्धा
  • पर्यटन कार्य

पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीत योगदान
  • कृष्ण आणि घटप्रभा नदीवर पूरग्रस्तांसाठी मदत कार्य
  • देवदासियांचं पुनर्वसन

ग्रामीण विकास योजना
  • ‘मदाभावी’ गावात पंचमुखी सक्रीय
  • आंगणवाडीत खेळण्यां पुरवणे
  • अंपग व्यक्तींना सहाय्य करणे
  • जयपूर येथे अपंगत्व नागरीकांसाठी छावणीची उभारणी.
  • कबड्डी स्पर्धेचं आयोजन
  • स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून जवळच्या गावांमध्ये शौचालय बांधण्यासाठी आर्थिक मदत पुरवणे.
  • स्थानिक सरकारी संयुक्त विद्यामानाने सामुहिक शौचालय बांधकाम.
बजेट

सीएसआर कार्यक्रमाचे दर वर्षाचे आर्थिक बजेटविषयी निर्णय कंपनी मंडळांने घ्यावेत. नियोजित सीएसआर कार्यक्रमांना अनुसरुन संबंधित बजेटला त्या वर्षी मंजूरी देण्यात यावी. एकूण अर्थसंकल्पीय रक्कमेचं वितरण खालील प्रमाणे गोदावरी बायोरिफायनरीज प्रकल्पांना द्यावी

  1. 1 प्रकल्प / गोदावरी बायोरिफायनरीज प्रकल्प – 85 % जसे
    • शैक्षणिक प्रसार
    • लिंग समानता आणि महिला सक्षमीकरण
    • बालमृत्यू सारखे घटनांवर नियंत्रण आणि माता आरोग्यामध्ये सुधारणा
    • इम्युनोडेफिशियन्सी व्हायरसवर मात, डेफिशियन्सी सिन्ड्रोम संपादित करणे आणि मलेरिया व इतर रोगावर मात करणे.
    • पर्यावरणाचे निरंतराबाबत खात्री करणे
    • राष्ट्रीय वारसा जपणे
  2. 2 पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीत योगदान / नैसर्गिक आपत्ती – 10 %
  3. 3 आकस्मिक आवश्यकता – 5%
नियमांनुसार प्रकल्प / कार्यक्रमाची अंमलबजावणी
  • स्वतंत्र विभागातील आणि योग्य पार्श्वभूमी असलेले वरीष्ठ अधिकारींनी व्यवस्थापकीय संचालकांना अहवाल सादर करावा अथवा व्यवस्थापकीय संचालक नामनिर्देशित अधिकां-यांनी सीएसआर कार्याची जबाबदारी स्वीकारावी. विभाग आवश्यक पूरक आणि अनुभवी सल्लागाराची नेमणूकही करु शकतो त्याकडे प्रकल्प राबवण्याची जबाबदारी असेल.
  • विशिष्ट प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी / गतिविधीसाठी विश्वासू ट्रस्ट / नोंदणीकृत समाज स्थापन केले जाऊ शकते.
  • संबंधित प्रकल्पाची मान्यता गोदावरी बायोरिफायनरीज थेट अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकाकडून लागू करुन घेऊ शकतो.
  • प्रकल्प पातळीवर स्वतंत्र अधिकारी वरिष्ठाच्या जागी सीएसआर विभागाचा प्रमुख असेल.
  • कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांच्या वतीने स्थापित सीएसआर समितीमध्ये दोन संचालक (एक स्वतंत्र) आणि सीएसआर अध्यक्ष व अंमलबजावणी/देखरेख समिती. संबंधित प्रकल्पाची निवड, अंमलबजावणी, देखरेखची जबाबदारी सल्लागार समितीकडे असेल.
  • ऑडिट – संबंधित प्रकल्पाच्या वर्षाच्या शेवटी स्वतंत्र यंत्रणेमार्फत कंपनी सीएसआर कार्यक्रम अंतर्गत राबविण्यात येणा-या प्रकल्पाचे सोशल ऑडिट होईल कंपनीच्या वतीने सोशल ऑडिट जेणेकरुन प्रकल्पाचा आढावा आणि सीएसआर हस्तक्षेपच्या परिणामाविषयी निकाल सादर होईल.
  • सर्वसामान्य –
  1. प्रशासकीय खर्च यासह वेतन व पगारावर झालेला खर्च, दौरा आणि प्रवास, प्रशिक्षण व संबंधित प्रकल्पासाठी स्वतंत्र व्यक्तीची नियुक्तीचा सर्व खर्च सीएसआर निधीतून केला जातो.
  2. प्रकल्पाची मंजूरी, सीएसआरसाठी निधी वाटप आणि आणि प्रकल्पासाठी अधिकृत संस्थेची नियुक्ती करण्याचा निर्णय एक सक्षम प्राधिकारीही घेवू शकतो. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक व मंडळाच्या नेतृत्वखाली उपक्रम राबविण्यात येतील.
  3. अंमलात आलेला संबंधित सीएसआर प्रकल्प योग्यरित्या अंमलबजावणी झालेली नसल्याचे निदर्शनात आले तर कुठल्या क्षणी गोदावरी बायोरिफायनरीज प्रकल्प निधी खंडित करु शाकतो.
  4. सीएसआर सल्लागार समितीच्या परवानगीनंतर संबंधित प्रकल्पाच्या मुल्यमापन सल्ल्यासाठी बाहेरील यंत्रणेचा आधार घेवू शकतो.
  5. धोरणांमध्ये सुधार करणे अथवा बदलण्याचा अधिकार अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकाकडे आहेत, तर मंजूरीसाठी मंडळापूढे सादर केले जातील.
सीएसआर प्रकल्प आणि उपक्रमासाठी प्रस्तावाचा विचार व निधी वाटपासाठी मार्गदर्शक तत्वे
  • स्वतंत्र प्रस्तावा सीएसआर धोरणांच्या चौकटीत असणं गरजेचं आहे,
  • प्रत्येक सीएसआर प्रकल्पाविषयी उपक्रम, वेळ, आर्थिक गरज, संस्थात्मक जबाबदारी परिणाम, अपेक्षित परिणाम आणि शाश्वत पैलूबाबत माहिती योग्य दिली पाहिजे. त्यानंतर सीएसआर विभागामार्फत प्रस्तावासंबंधित मूल्यमापन आणि शिफारसी दिली जातील,
  • योग्य आर्थिक गरजेची माहिती प्रकल्पाचे अध्यक्षांना सुपूर्द करणे जेणेकरुन प्रकल्पाला वेळेत अंमलबजावणीची परवानगी देण्यात येईल.
  • संबंधित प्रस्तावाला टप्प्याटप्प्याने देण्यात येणा-या निधीविषयी माहितीची नोंद असणे निधी वाटपापूर्वी गरजेचे असून जेणेकरुन योग्य वापर आणि नियतकालिक प्रगतीचा अहवाल सादर होईल.
  • कंपनीच्या वतीनं प्रकल्प प्रस्ताव तयार करण्यात येतो. सीएसआर धोरणांच्या कार्यकक्षेत राज्य, जिल्हा, स्थानिक प्राधिकरणाच्यावतीने सीएसआर प्रकल्प तयार केला जातो त्यासह सक्षम प्राधिकारी प्रकल्पाच्या अंमलबजावणीला मंजूरी देण्यात येते.
  • कंपनीच्यावतीनेच नामांकित संस्था अथवा राज्य सरकारद्वारे प्रस्तावाला अंमलात केले जाऊ शकते. जसे कंपनी योग्य समजले तसं.