शेतकरी शाश्वतता
शेतक-याचा उत्कर्ष झाला तरच कंपनी जोमाने वाढेल. संसाधनाची कार्यक्षमता, पर्यावरणाचं पुनरूज्जीवन आणि ग्रामीण समुदायांची उन्नती करत शेतक-यांसाठी शाश्वत मुल्यांची निर्मिती करणं हेच आमचं व्हिजन आहे. अल्पभूधारक शेतक-यांना अल्प परताव्याच्या आव्हानाला तोंज द्यावं लागतं. कुटुंबाला गाव सोडून शहरांमध्ये स्थायिक व्हावं लागतं. एकाच हंगामात जमिनीत दोन भिन्न पिकं घेत जमिनीच्या पर्याप्त उपयोगितेचं तंत्र शिकवून या शेतक-यांची उत्पादकता आम्ही वाढवली आहे.
ऊस लागवडीसाठीच्या कृषीपद्धती, सिंचनपद्धतींबद्दल आमचे तज्ज्ञ सतत नॉलेज शेअरिंग करत असतात. त्याचा परिणाम असा होतो की शेतक-यांना पाणी, मजूर, किटकनाशकं, खतं यांच्या वापरात बचत करता येते. त्याचाच चांगला परिणाम पर्यावरणावर होतो.
शेतक-यांना योग्य प्रशिक्षण आणि साधनं पुरवत त्यांच्या शेतजमिनी अधिक उपजाऊ, कार्यक्षम आणि फायदेशीर बनवणं आणि हे करताना त्यांच्या जमिनीचा कस दीर्घकाळ टिकवणं यासाठी आम्ही त्यांच्यासोबत काम करतो. उदाहरणार्थ जिओग्राफिक इनफॉर्मेशन सिस्टम (जीआयएस)च्या माध्यमातून एका विशिष्ट भूभागाची सॅटेलाइट इमेजेस ट्रॅक केली जातात. आणि तिथल्या वनस्पती असलेल्या तसंच नसलेल्या भागाची माहिती शेतक-यांना दिली जाते. हे टूल पिकांच्या माहितीचं विश्लेषण करतं आणि नदीपात्रातील चांगल्या दर्जाच्या मातीची, तिथल्या पाण्याच्या उपलब्धतेची आणि वनस्पतींची माहितीही पुरवतं.