सोमैया ग्रामीण विकास केंद्र
ग्रामोद्योगांवर आधारित संस्था म्हणून आम्हाला आमच्या निर्मिती प्रकल्पांमधील व भोवतालच्या समुदायांना चांगले जीवनमान पुरविण्यासाठी आमच्या भूमिकेची आम्हाला जाणीव आहे. आम्ही कार्यरत असलेल्या समुदायांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात योगदान देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या संदर्भात आम्ही समुदायाशी सल्लामसलत करत आहोत.
सोमैया संस्थेच्या विविध नामवंत संस्थाच्या सहकार्याने आम्ही आमचे विविध प्रकल्प पुढे आणत आहोत. सोमैया ग्रामीण विकास केंद्रा तर्फे या समुदायांना उपयुक्त अशा उपक्रमांमध्ये आरोग्य, शिक्षण, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांचा समावेश आहे.
आरोग्य सेवा
समुदायांच्या आरोग्यविषयक विभांगांमध्ये आम्ही विविध स्वयंसेवी उपक्रम हाथी घेतले. वाजवी दरातील आरोग्यविषयक सुविधांच्या अभावामुळे आरोग्य सेवा हे दुर्गम भागात सर्वात मोठे आव्हान आहे. वैद्यकीय सुविधांसाठी, विशेषत: खास वैद्यकीय सुविधांसाठी खेड्यांतील लोकांना लांबचा प्रवास करावा लागतो. ही विश्वसनीय वाहतुकीचा अभावामुळे हा लक्षणीय खर्च आहे.
ग्रामस्थांना आरोग्यविषयक, प्रतिबंधात्मक सुविधा आणि उपचार पुरवण्यासाठी आम्ही क जे सोमैया मेडीकल कॉलेज आणि संशोधन केंद्र, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने साकरवाडी आणि समीरवाडी येथे मोफत वैद्यकीय निदान आणि औषध वितरण शिबिरे आयोजित करतो. आमच्या प्रकल्पातील आणि भोवतालच्या सुमारे ७५ ते ८० गावांतील २३०० पेक्षा जास्त रुग्ण प्रत्येक शिबिराला भेट देतात.
या शिबिरांमध्ये ज्यांना मोतीबिंदू, कर्करोग, आणि इतर ऑपरेशन्स सारख्या विशिष्ट उपचारांची गरज आहे अशा शेकडो रुग्णांना ओळखून त्यांना क.जे.सोमैया रुग्णालय, मुंबई किंवा एम एम जोशी नेत्र संस्था, हुबळी येथे मोतीबिंदू ऑपरेशन साठी पाठवण्यात येते. २०१५ मध्ये ६ रुग्णांना बेळगावातील के.ल.ई रुग्णालयात कान नाक, घशाच्या उपचारासाठी तसेच इतर सर्जरी आणि उपचारांसाठी पाठवण्यात आले आहे.
जागरूकता निर्माण करणे
आम्ही तंबाखू, एच.आय.व्ही आणि इतर आरोग्यविषयक समस्या व त्यांचे दुष्परिणाम या विषयी जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबवतो.
यशोगाथा
"मला ३ मुलं आणि २ मुली आहेत.सर्वांची लग्न झाली आहेत आणि मुली त्यांच्या जोडीदाराबरोबर स्थिरस्थावर झाल्या आहेत. त्याबरोबरच माझ्या सर्व मुलांची देखील लग्न झाली आहेत आणि ते कामकाजात व्यस्त आहेत."
मला सांगायला खूप दु:ख होत आहे की माझी आणि माझ्या बायकोची कोणताही मुलगा काळजी घेत नाही. त्यामुळे,आम्हांला एक भाड्याच्या घरात स्वतंत्रपणे राहण्यास भाग पडले. मला दरमहिना ५०० रुपये सरकारी वृद्धावस्था पेंशन मिळते आणि माझी बायको मजूरी करते. मला मोतीबिंदू मुळे नीट दिसत नव्हतं आणि पुरेसे पैसे नसल्यामुळे मी उपचार ही करू शकत नव्हतो. मी सोमैया कंपनी आयोजित वैद्यकीय छावणीत तपासणी केली आणि माझं मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली. शिवाय मी हर्नियाच्या दुखण्याने ग्रासलो होतो, त्यावर देखील अलीकडील वैद्यकीय छावणीत शस्त्रक्रिया करण्यात आली.
मी सोमैया कंपनीकडून घेतलेली वैद्यकीय मदत कधीच विसरू शकणार नाही, त्यांच्यामुळे मी आज कोणावर अवलंबून नाही.
श्री सताप्पा के हुंश्याल
- वय : ७७ वर्षे
- |
- व्यवसाय : शेती
- |
- ठिकाण:कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील सैदापूर
- |
- शिक्षण:7 वी
" मी माझे पती , मुलगा, सून आणि मुलगी यांना गमावले. माझ्या बहिणीचे देखील निधन झाले आहे. आता मी माझ्या नातवाबरोबर राहात आहे, तो आयटीआय शिकत आहे ".
जी काही थोडी मालमत्ता माझ्याकडे होती ती सुद्धा माझ्या दूरच्या नातेवाईकांनी काढून घेतली. मी एका भाड्याच्या झोपडीत राहते. मला वृद्ध पेन्शन म्हणून सरकारकडून ५०० रुपये मिळतात आणि जगण्यासाठी मोलकरीण म्हणून ४-५ घरांत काम करते.
मला नीट दिसत नव्हते त्यामुळे मी कोणतेही काम करू शकत नव्हते. मला सोमैया कारखाना वैद्यकीय छावणी विषयी बातमी मिळाली आणि तिथे माझ्या मोतीबिंदूचे ऑपरेशन केले. मला माझी दृष्टी परत मिळाली आणि आता मी काम करण्यास सक्षम आहे.
श्रीमती बलव्वा व्ही. अल्गोंड
- वय :६८ वर्षे
- |
- व्यवसाय : शेती
- |
- ठिकाण:कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील हाल्लूर गाव
- |
- शिक्षण:7 वी