अध्यक्षांचा संदेश

प्रिय भागधारक,

सर्वप्रकारे ‘सामान्यत्वाच्या पलिकडे चला’ हेच आहे आमचं धोरण. हे धोरण राबवत असतानाच आम्ही आमचे शेतकरी, ग्राहक, समाज आणि सहकारी यांच्या गरजा पूर्ण करतो. कुठलाही फीडस्टॉक असो किंवा ऊस, इथेनॉल, काकवी, ऊसाची चिपाडं किंवा इतर पिकांची गुणवत्ता वाढवणं हेही आमचं धोरण आहे. आम्ही निर्माण करत असलेल्या उत्पादनांमध्ये तसंच ब्रँडमध्येही हेच धोरण अवलंबलं जातं. भौतिक, रासायिनिक किंवा जैविक प्रक्रिया करून इंधन, ऊर्जा, रसायनं तसंच इतर उपयुक्त उत्पादनं तयार करणं हे कंपनीचं कौशल्य आहे. कृषीक्षेत्रात काम करण्याचा आम्हाला अनुभव आहे आणि म्हणूनच आम्ही बायोमास तयार करू शकतो.

याच धोरणाचा अवलंब करण्यासाठी आम्ही बायोमासचं रूपांतर सेल्यूलोज, हेमीसेल्यूलोज, लिग्निन आणि इतर संलग्न उत्पादनांमध्ये करत आहोत. इथेनॉलच्या मूल्यवर्धनाबरोबरच साखरेच्या फर्मेंटेशनमधून उच्च मूल्यप्राप्त उत्पादनांसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ब्रँडेड फूड्सच्या बाजारपेठेत यशस्वीरित्या प्रवेश शक्य होणं गरजेचं आहे. या धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे विक्रीमध्ये, मूल्यवर्धनामध्ये तसंच प्रतिटन ऊसामधून निर्माण होणा-या मूल्यांमध्ये लक्षणीय फरक दिसून येईल. या क्षेत्रातील आमच्या ज्ञानवर्धनासाठी, शक्य तिथे आमच्या बौद्धिक संपदेचं (Intellectual Property) रक्षण करण्यासाठी आणि जिथे गरज आहे तिथे परवाना प्राप्त करण्यासाठी आमचे संशोधक कार्यरत आहेत.

हे ध्येय साध्य करण्यासाठी मागील काही महिन्यांमध्ये आम्ही गोदावरी बायोरिफायनरीजमध्ये प्रायव्हेट इक्विटी उभी केली आहे. मंडाला कॅपिटल हा गुंतवणूकदार आहे. जागतिक दर्जाची बायोरिफायनरी बनवण्याचं आमचं ध्येय ते जाणून आहेत. तसंच आम्ही प्रक्रिया करत असलेल्या बायोमासला (ऊस, काकवी, ऊसाची चिपाडं) अधिकाधिक मूल्य प्राप्त करून देण्याचं आमचं मॉडेलही त्यांनी जाणलं आहे. सध्या जिथे ऊसाची किंमत जास्त आहे मात्र साखरेची किंमत अधिक आहे अशा परिस्थितीत याच मॉडेलची गरज आहे. अशा प्रकारच्या गुंतवणूकीच्या माध्यमातून या कठीण परिस्थितीतही आम्ही कंपनीला एका नव्या उंचीवर नेऊ शकू हा विश्वास आम्हाला आहे. आणि हेच आमचे संस्थापक, श्री. श्री क जे सोमैया आणि माझे वडील डॉ. एस. के. सोमैया यांचं स्वप्न आहे.

मात्र या प्रगतीपथावर चालताना आम्हाला अनेक आव्हानांचा आज सामना करावा लागत आहे. साखरेच्या किंमतींमधली घसरण आणि त्याचवेळी सरकारने निश्चित केलेले ऊसाचे चढे दर अशा दुहेरी संकटात साखर क्षेत्र सापडलं आहे. ऊसाचे दर हा भारतीय साखर क्षेत्रापुढला सर्वात मोठा पेच आहे. आम्हीही याला अपवाद नाही. साखरेच्या किंमती कमी असल्याकारणाने उसाचा एफआरपी देणं फार कठीण असल्याचं उद्योगक्षेत्राने सरकारपर्यंत पोहोचवलेलं आहे. ज्या सीएसीपीच्या शिफारशीनुसार सरकारने एफआरपीची घोषणा केली त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलं होतं की रंगराजन फॉर्मुलाच्या संयोगाने एफआरपी ठरवला जावा. ऊस आणि साखरेच्या किंमती परस्परांवर आधारित असाव्या असा रंगराजन फॉर्मुला आहे. जर का रंगराजन फॉर्मुलापेक्षा एफआरपी जास्त असेल तर असलेली तफावत सरकारने भरून द्यावी अशी शिफारसही सीएसीपीने केली होती. सरकारने एफाआरपीची घोषणा करताना शिफारशींमधील हा बाबीची दखल घेतली नाही.

एफआरपीचा ज्यादा दर शेतक-यांना अधिकाधिक ऊसाची लागवड करण्यास कारणीभूत ठरत आहे. गरजेपेक्षा अधिक साखरेचं उत्पादन होत असल्यामुळे किंमतींमध्ये घसरण होत आहे. त्यामुळेच आर्थिकरित्या हे अव्यवहार्य बनलं आहे.

यावर उपाय म्हणजे ऊसाची कमी लागवड करायची (साखर किंमतीला पूरक असा बाजारभाव ऊसाला देऊन), अतिरिक्त ऊसाची निर्यात करायची (हे कदाचित डब्लूटीओशी सुसंगत असू किंवा नसूही शकतं) किंवा मग ऊसाची मागणी वाढवायची (इथेनॉल किंवा बायोकेमिकल्स प्रोग्रामच्या माध्यमातून) हे जेव्हा होईल तेव्हाच ही तफावत दूर होईल आणि बाजार समतोल होईल. ही समस्या कशा पद्धतीने हाताळायची यावर सरकारने विचार केला पाहिजे.

सरकारने साखर आणि इथेनॉल धोरणामध्येही बदल केले. स्थानिक बाजारातील गळती रोखण्यासाठी शुद्ध साखर तसंच कच्च्या मालाच्या आयात आणि पुनर्नियात प्रक्रियेतही बदल करण्यात आले. आयात शुल्कात वाढ करत ते २५ टक्क्यांवरून ४० टक्क्यांवर करण्यात आलं. आणि त्याचवेळी इंधनासाठी पुरवठा करण्यात येणा-या इथेनॉलवरील अबकारी आकारणीमध्ये सूट देण्यात आली. इंधन विक्रेत्यांकडून हा १२ टक्क्यांचा लाभ ऊस खरेदीसाठी चक्की चालवणा-यांना दिला जाणार आहे. पुढल्या हंगामापासून याची अंमलबजावणी होणार आहे.

जसं मी आधी म्हणालो तसं साखरेच्या कमी किंमती हे सुद्धा एक आव्हान आहे. किंमतीचं संतुलन राखण्यासाठी आम्ही रिफाइन्ड साखरेची निर्यात करतो तसंच औद्योगिक खरेदीदारांना साखर पुरवतो. ग्लोबल फूड सेफ्टी इनिशिएटिव्ह म्हणजेच जीएफएसआयची (एका पेक्षा अधिक औद्योगिक खरेदीदारांना खाद्यमाल विक्री करण्यासाठीचे नियम घालून देण्याचं काम ही संस्था करते) मान्यता आम्हाला प्राप्त आहे. सर्व नियमांचं पालन करत आम्ही या ऑडिटमध्ये उत्तीर्ण झालो. यासाठी संपूर्ण टीमचं अभिनंदन. औद्योगिक ग्राहकांसोबत असणा-या करारांमुळेच आम्ही साखरेच्या किंमती कमी असूनही या क्षेत्रात टिकून आहोत.

गेल्या वर्षी धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर आम्ही साखरेचा ब्रँड लाँच केला. या ब्रँडसाठी आम्ही ‘जीवना’ म्हणजेच जीवन हे नाव घेतलं आहे. किरकोळ विक्रेते तसंच ग्राहकांना अधिक उत्पादनं देण्यासाठीच आम्ही साखरेसोबत मीठाचाही समावेश केला आहे.

ऊस आणि साखरेच्या किंमतींमध्ये चढ-उतार असून देखील आम्ही शेतक-यांसोबत तितक्याच आत्मियतेने काम करत आहोत. आम्ही दोघांच्या दीर्घकालीन यशासाठी हे गरजेचं आहे. आमचं हे नातं अतूट आहे. तात्पुरत्या तसंच दीर्घकाळासाठी शेत आणि शेतकरी दोघेही सुदृढ आणि सशक्त असावेत हे आमचं ध्येय आहे. आणि हे करण्यासाठी आम्ही ठिबक सिंचन, आंतरपिकं, मृदा तपासणी, दर्जात्मक मालाचा पुरवठा, टिश्यू कल्चर असलेल्या वनस्पतींचा पुरवठा आणि कृषीमृदाविज्ञान यांचा आधार घेत आहोत.

साखरेसोबतच इथेनॉलचं उत्पादन आर्थिकदृष्ट्या शक्य असल्याने सरकारच्या इथेनॉलविषयकच्या धोरणातील बदलाचा परिणाम आमच्या अल्पकालीन गुंतवणुकीवर होणार आहे. या कार्यक्रमातील आमचा सहभाग वाढवण्यासाठी आम्ही सुक्या इथेनॉलची क्षमता वाढवण्याचं ठरवलं आहे तसंच समीरवाडी इथे कचरा जाळून टाकण्यासाठी आणखी एक भट्टी सुरू करण्याची आमची योजना आहे.

साकरवाडीसाठीही आम्ही एक बॉयलर मागवला आहे. यामुळे इथेनॉल बनवण्याचा खर्च कमी होईल आणि इथाइल अॅसिटेट, क्रोटोनाल्डिहाइडसारख्या इथेनॉलवर आधारित रसायनं बनवण्याची आमचा क्षमता वाढेल.

मला सांगण्यास आनंद होतो की आमच्या नव्या एमपीओ प्लांटला सुरूवात झाली असून ग्राहकांना माल पुरवण्यास एप्रिलमध्येच सुरूवात झाली आहे. हा प्लांट उत्तमरित्या काम करत आहे. यामुळे कंपनीचं परिवर्तन होऊन ती ज्ञानाधारित रसायनाच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. येत्या काळात आम्ही अधिक रसायनं विकसित करू.

मेण, इथाइल अॅसिटेट, १,३ ब्युटेन डायल आणि आमच्या परदेशातील खाणींनाही उत्तम प्रतिसाद लाभत आहे. या बाजारपेठेत मोठी सफलता मिळवण्याबाबत आम्ही आशावादी आहोत.

उदयोन्मुख उत्पादनांसाठी (Future Products) संशोधन करण्याबाबतही आम्ही पावलं उचलली आहेत. सेल्यूलोजचं आणखी विघटन करण्यासाठी उपयुक्त ठरणारा प्रायोगिक तत्वावरचा प्लांट आम्ही उभारला आहे. तसंच साखरेचं फर्मेंटेशन करून पायरोव्हेट्स आणि ड्लाक्टिक अॅसिड तयार करण्यासाठी आम्हाला भारत सरकारची परवानगी मिळाली आहे.

संशोधनातूनच आम्ही आमच्या विकासाची वाटचाल निश्चित करतो. संशोधनाला प्रोत्साहन देणारी प्रयोगशाळा उभारण्याला आमच्या संचालक मंडळाने परवानगी दिलेली आहे. त्याकरता नवी मुंबई येथे आम्ही जमीनही खरेदी केलेली आहे. त्याठिकाणी बांधकामाला सुरूवात झाली असून वेळापत्रकानुसार काम सुरू आहे. मार्च २०१६पर्यंत ही प्रयोगशाळा वापराकरता तयार होईल.

आमचा प्रवास असाच सुरू ठेवत आणि परिवर्तन होत असताना, जग झपाट्याने बदलत आहे आणि आम्हाला त्यापेक्षा अधिक वेगाने बदलण्याची गरज आहे याचीही आम्हाला जाणीव आहे. आमची उद्दिष्टं साध्य करत असताना आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय या त्रिसूत्रीकडे आमचं पूर्ण लक्ष आहे. आमचं तंत्रज्ञान, प्रक्रिया आणि अंमलबजावणी ही याच त्रिसूत्रींभोवती कार्यरत आहे. आमच्या पूर्वजांनी रचलेल्या पायावर उभारणी करत, आजच्या काळातील भक्कम आणि सुयोग्य कार्यपद्धतीने आम्ही उज्वल भविष्याकडे वाटचाल करत आहोत. आम्ही जे काही करत आहोत त्यात आम्ही सदैव आघाडीवर असू.

समीर सोमैया

अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

(२०१४-२०१५)