नाविन्यपूर्णता

आमचे नाविन्यपूर्ण उपक्रम हे आमच्या कॉर्पोरेट व्हिजनला अनुसरुनच असतात. त्रिसुत्रीवर आधारित नाविन्याची निर्मिती हेच आहे आमचे व्हिजन.

त्यामुळेच शाश्वतता हे आमच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांचं मूळ आहे. आमच्यासाठी नाविन्य म्हणजे नैसर्गिक संसाधनांचा वापर अधिक कार्यक्षमतेने करणे. तसंच ऊसाच्या शेतातील मातीचा कस अधिकाधिक चांगला होण्यासंबंधित संशोधनाचे नवनवीन मार्ग शोधणं. शेतकरी, शास्त्रज्ञ आणि ग्राहकांना सोबत घेऊन ऊस उत्पादन शेतक-यांसाठी अल्प दरात रसायनं उपलब्ध करुन देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शेतक-यांपासून ते ग्राहकांपर्यंतच्या विविध भागधारकांचा उत्कर्ष साधणं म्हणजेच नाविन्य आहे असं आम्ही मानतो.

आमचा विश्वास आहे की, शाश्वततेसाठी रासायनिक प्रक्रिया ह्या पर्यावरणास अनुकूल, ऊर्जा आणि साहित्य; कार्यक्षम आणि व्यापारीदृष्ट्या उपयुक्त असणे आवश्यक आहे. नवनिर्मितीचं पहिलं पैलू म्हणजे, कच्चा माल दूरगामी, आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य, सुरक्षित, कमी प्रभावी आणि तुलनेनं उच्च श्रेणीचा आहे का हे बघणं. नवनिर्मितीचा दूसरा पैलू म्हणजे विद्यमान उत्पादनाची प्रक्रिया अधिक शाश्वत आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य करणे. आणि तिसरा पैलू हा की कच्च्या मालाचं मूल्य वाढवून रासायनिक उत्पादनाचे गुणात्मक कार्यक्षमतेकडे लक्ष केंद्रित करणे आणि अपव्यय मालाचं नावीन्यपूर्ण उत्पादन करणे.

शाश्वतता हेच आमचं मुलभूत तत्व असल्याने, त्याला अनुसरुन निसर्गापासून एक महत्त्वाचा धडा आम्ही शिकलो आहोत आणि तो म्हणजे पर्यावरणीय अन्न साखळी जिथे एक प्रजाती दुस-या प्रजातीवर अवलंबून असते. याच आधारावर नवीन उत्पादन निर्मितीसाठी कच्च्या मालाचं रुपांतर अथवा उत्पादन करुन अपव्यय झालेल्या मालाची विल्हेवाट लावण्याच्या पारंपारिक प्रक्रियेला आव्हान दिलं.

 आमच्या नवनिर्मितीच्या परंपरेला खतपाणी घालण्यासाठी तशा पद्धतीचे सशक्त प्रयत्न आम्ही करतो. नवीन कल्पना आणि उत्पादनांना प्रायोगिक तत्वावर विकसित केलं जातं आणि मार्गदर्शक तत्वांनुसार मग त्यांना व्यावसायिक रूपात तयार केलं जातं.

मेणाचं मूल्य आणि कच-याचा क्षय

ऊसाच्या टाकाऊ मालापासून उच्चप्रतीची उत्पादनं बनवणं हे नवनिर्मिती आणि शाश्वत अर्थकारणासाठी महत्त्वाचं आहे. ऊसाचं साल हा टाकाऊ माल आहे. पण यामध्येच मेण दडलेलं असतं. पांढर-गडद पिवळ्या रंगाचं एक आवरण ऊसाच्या पृष्ठभागावर असतं. विविध ठिकाणी वापरासाठी नैसर्गिक मेणाची मागणी वाढत आहे. त्यामुळेच सौंदर्य प्रसाधनं, खाद्य पदार्थं, औषधांमध्ये वापरण्यात येणा-या कॅर्नौबा मेणाला पर्याय म्हणून या नैसर्गिक मेणाकडे पाहिलं जातं. टाकाऊ मालापासून चांगल्या दर्जाची उत्पादनं बनवणं हे आमचं उद्दिष्ट असल्यामुळे अशा प्रकारे मेण बनवणं आणि ते आर्थिकदृष्ट्या यशस्वी करणं हे आव्हान होतं. ते आव्हान आम्ही यशस्वीरित्या पेललं.

मेण मिळवण्याच्या विविध पद्धतींवर आम्ही काम केलं आहे. नैसर्गिक आणि भाज्यांवर आधारित उत्पादनांचं व्यापारीकरण करण्यात आम्ही अग्रेसर आहोत. शिवाय आमचा नेचरोवॅक्स हा ब्रॅण्ड कर्नौबा मेणाला मागे टाकत आहे.

खाणकामातला देवदूत

खाणकाम हे बहुतांशवेळा पर्यावरणाला हानिकारक असतं. पण खाणकामाला विकसित करून त्याचे पर्यावरणावर होणारे परिणाम कमी करणं शक्य आहे. पुनर्वापरयोग्य साधनांपासून तयार केलेली रसायनं वापरत असल्यामुळे इंडस्ट्रीला शाश्वततेच्या दिशेने नेण्यात मदत होत आहे. खाणकामात वापरला जाणारा सॉमफ्रॉथ हा फेसाळ एजंट पुनर्वापरयोग्य कच्च्या मालापासून तयार केला जातो. पाईन ऑईल आणि मिथाईल आयसोब्युटाइलला पर्याय असणारा सॉमफ्रॉथ फेसाचे गुणधर्म वाढवतो. इकोफ्रेंडली असं हे सोल्युशन असल्याने त्याच्या वापरामुळे इतर रसायनांचा वापर कमी होतो. बायोडिग्रेडेबल आणि बिनधोक्याचा असल्यामुळे सॉमफॉर्थ अद्वितीय ठरतो.

सेल्यूलोज

आम्ही सध्या नेक्स्ट-जनरेशन बायोरिफायनरीजवर काम करत आहोत. अशा बायोरिफायनरीज जिथे उसाच्या चिपाडांवर प्रक्रिया होऊन त्यांच्यापासून सेल्यूलोज, हेमिसेल्यूलोज आणि लिग्निग तयार केलं जाईल आणि त्याचा वापर गुणवर्धक रसायनांच्या निर्मितीमध्ये केला जाईल.

भूमीच देणं

कच-यापासून आम्ही कंपोस्ट खत बनवतो ज्यामध्ये मुबलक सेंद्रिय पोषक घटक आहेत. आम्ही हे कंपोस्ट खत भूमिलाभ या नावाने विकतो. नोंद घेण्यासारखी गोष्ट अशी की जेव्हा सेंद्रिय खतांविषयी कुणीही विचार करत नव्हतं तेव्हा अशा पद्धतीने खत बनवून त्याची विक्री करण्यामध्ये आम्ही अग्रेसर होतो.

थोडक्यात आम्ही कच्या मालाचे उत्पादन आणि टाकाऊ कचऱ्याची विल्हेवाट लावणाऱ्या पारंपारिक पद्धतीला आव्हान दिले. त्याऐवजी एका प्रक्रियेतील टाकाऊ पदार्थ हा दुस-या प्रक्रियेसाठी कच्चा माल बून शकतो हे जाणून आम्ही त्यादिशेने पावलं उचलली. फक्त प्रक्रियेसाठीच नाही तर आम्ही शेतीमध्येही नवीन बदल घडवून आणले आणि शेतकरीभिमुख नवीन बाजार व्यवस्था निर्माण करून दिली.