उद्देश आणि ध्येय
- जागतिक दर्जाची संस्था बनवणे
- एकीकृत बायोरिफायनरी (इंटिग्रेटेड बायोरिफायनरी) बनणे
- साखर आणि त्याला आनुषंगिक उत्पादनांचे एकत्रित असा उत्पादक बनणे
- कंपनी प्रक्रिया करत असेल्या बायोमासच्या गुणवत्तेत भर घालणे. कच्च्या मालाचा पुरेपूर वापर करत नवीन उत्पादनांची निर्मिती करणे आणि नवीन बाजारपेठांमध्ये प्रविष्ट होणे.
- एकसमान किंवा उच्च क्षमता असणा-या विविध प्रकारच्या जैवभारांवर काम करणे.
- ग्राहकांच्या गरजा आणि अपेक्षा समजून त्यांची पूर्तता करणे.
- कार्यकुशल व्यवस्थापन, नवनिर्माण आणि सांघिक कामगिरीच्या माध्यमातून भागधारकांना अधिकाधिक लाभ मिळवून देणे
- ज्या समाजासाठी कंपनी कार्यरत आहे त्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहणे तसंच योगदान देणे.
- प्रत्येक व्यक्ती आपल्या महत्त्वाकांक्षेच्या जोरावर काहीतरी बदल घडवू शकेल, जिथे चांगल्या कामाचं नेहमीच कौतुक होईल आणि त्या कामाचा लोकांना अभिमान असेल अशी कंपनी बनवणे.
- सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय क्षेत्रात नवनिर्माण करणे हे आमचे ब्रीदवाक्य आहे.
- उत्तमोत्तम पद्धतींनी अल्पकालीन तसंच दीर्घकालीन पर्यावरणीय आणि आर्थिक शाश्वतता आणण्यासाठी आमच्या शेतकरी बांधवांना मदत करणे.
- अधिक चांगलं जीवन जगण्यासाठी ग्राहकांना सकस अन्न मिळावं म्हणून फूड ब्रँड तयार करणे. एक सशक्त आणि सक्षम पुरवठा साखळी तयार करून ग्राहकांना उत्कृष्ट दर्जाचे ब्रॅंडेड फूड्स दिले जाईल.