शाश्वतता

प्रगत शाश्वततेचा आमचा वारसा आहे. समाजाने आपल्याला जेवढं दिलं त्यापेक्षा अधिक आपण समाजाला द्यावं यावर आमच्या संस्थापकांचा विश्वास होता. त्यावरच आमची कंपनी उभी आहे. आमच्या समृद्ध आणि यशस्वी वाटचालीदरम्यान ज्या समाजात आम्ही वावरतो त्यासाठी योगदान दिलेलं आहे.

आर्थिकरित्या यशस्वी होणं, पर्यावरणाच्या बाबतीत जबाबदारीने वागणं आणि समाजासाठी सतत योगदान देणं यांमध्ये समन्वय साधणं हीच आमच्या कंपनीची मूल्यं आहेत. ऊज्ज्वल भविष्याच्या उभारणीसाठीच आम्ही आमचे ग्राहक आणि समाजासोबत काम करत आहोत.

आमच्यासाठी शाश्वतता हा एक प्रवास आहे. भागीदार. गुंतवणूकदार, ग्राहक, कर्मचारी वर्ग, समाज, पुरवठादार आणि वितरक यांच्यासोबतच हा प्रवास आहे. परस्परांशी समन्वय ठेवत आणि सहयोगाने हा प्रवास फायदेशीर ठरत आहे.

पर्यावरणीय समस्यांवरील उपाययोजनांसाठी रसायन शास्त्राची भूमिका महत्त्वाची आहे. पुनर्वापरायोग्य स्रोतांचा व्यावसायिक वापर करता यावा यासाठी होणा-या शोधांचा फायदा रसायन निर्मितीसाठी लागणा-या कच्च्या मालाला होऊ शकतो. जेणेकरून अनेक उद्योगक्षेत्रांमध्ये शाश्वततेची मूल्ये रूजतील.

पारंपरिक ऊर्जास्रोतांना पर्यायी पुनर्वापरायोग्य ऊर्जास्रोत उपलब्ध व्हावेत यासाठी आम्ही कार्यरत आहोत. आमचे मल्टिपर्पज पायलट प्लांट्स अडीच मेट्रिक टनापर्यंतची कस्टमर सँपलिंग तयार करू शकतात तसंच प्रयोगशाळेपासून ते प्रॉडक्शनसाठीची उत्पादनंही तयार करू शकतात.