नेतृत्व

संचालक मंडळ:

  • श्री समीर एस सोमैया (अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक)

    श्री. समीर सोमैया यांनी १९९२ मध्ये कॉर्नेल विद्यापीठातून रासायनिक अभियांत्रिकी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यांनी १९९३ मध्ये कॉर्नेल विद्यापीठातून एमबीए आणि २००५ मध्ये हार्वर्ड विद्यापीठातून सार्वजनिक प्रशासनमध्ये पदवी मिळवली. १९८९  मध्ये अमेरिकन इन्स्टिट्यूटचा शैक्षणिक जीवनगौरव रासायनिक इंजिनीअर पुरस्कार आणि १९९० मध्ये अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ केमिस्ट्स पुरस्कार जिंकला. १९९३  मध्ये ते गोदावरी बायोरिफायनरीज् लिमिटेडमध्ये कार्यरत झाले. त्यांनी संशोधन आणि नवनिर्माणाच्या माध्यमातून आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणावर लक्ष केंद्रित करत कंपनीला पुढे नेलं आहे. समीर सोमैया यांनी आपले वडील आणि आजोबा यांचा वारसा पुढे नेऊन समाजातील वंचित घटकांचा जीवनस्तर सुधारण्यासाठी सक्रीय पुढाकार घेतला.

    त्यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय, अभियांत्रिकी, कला आणि विज्ञान, धर्म, व्यावसायिक अभ्यास, शिक्षण, भाषा, इत्यादी विविध क्षेत्रातील प्राथमिक ते पी.एच.डीपर्यंतचे शिक्षण पुरविणा-या ३० हून अधिक शैक्षणिक संस्था सोमैया विश्वस्त संस्था सांभाळत आहे. ३५ हजाराहून अधिक विद्यार्थी आणि १,३०० शिक्षक आहेत. ५०० पलंगांचे नागरी शैक्षणिक रुग्णालय तसेच ४० पलंगांचे ग्रामीण रुग्णालय आहे. विश्वस्त संस्था एकत्रित ८ शाळा चालवितात त्यापैकी ६ ग्रामीण महाराष्ट्र आणि कर्नाटकात आहेत.

    श्री समीर सोमैया हे सोमैया विद्याविहारचे अध्यक्ष, क जे सोमैया विश्वस्त संस्था, क जे सोमैया वैद्यकीय विश्वस्त संस्था, उपयोजित कृषी संशोधन संस्था आणि गिरीवनवासी प्रगती मंडळाचे अध्यक्ष आहेत.

    अधिक वाचा

    कॉर्नेल विद्यापीठातील रासायनिक अभियांत्रिकी संस्थेत पाहणार प्रशिक्षक म्हणून काम करताना ते शिक्षण आणि रसायशास्त्राविषयीचे आपले प्रेम यांची सांगड घालतात. त्यांनी भारतीय साखर आणि रासायनिक उद्योगांत फार महत्वाची भूमिका बजावली आहे. २००६ ते २००८ मध्ये ते भारतीय रासायनिक परिषदेचे (पश्चिम विभाग) अध्यक्ष आणि २००९ मध्ये भारतीय साखर कारखाने मंडळाचे अध्यक्ष होते.

    पंतप्रधानांच्या मुख्य शास्त्रीय सल्लागार समिती, अमेरीकेतील कॉर्नेल विद्यापीठातील रासायनिक अभियांत्रिकी शाखेची सल्लागार समिती, अमेरीकेतील डार्टमाऊथ येथील मॅसेच्युसेट्स विद्यापीठातील भारत विषयक अभ्यास केंद्र, अस्ताना, कझाकस्तान येथील धार्मिक नेत्यांच्या परिषदेने स्थापन केलेल्या हरित रासायनिक पुढाकार समितीचे ते सदस्य आहेत

  • श्री एस एन बाबलेश्वरसंचालक

    श्री एस एन बाबलेश्वर यांनी रसायनशास्त्रातील पदवी आणि साखर तंत्रज्ञानमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असून रसायन अभियांत्रिकी संस्था जाधवपूर विद्यापीठ, कोलकाता मध्ये ते एक सहकारी सदस्य आहेत. श्री एस एन बाबलेश्वर ४० वर्षांपूर्वी कंपनीमध्ये कार्यरत झाले.

    अधिक वाचा

    त्यांच्या प्रगतीला सुरुवात समीरवाडी इथल्या गोदावरी रिफायनरीजच्या संचालक (वर्क्स) पदापर्यंतचा प्रवास सुरू झाला तो लॅब केमिस्ट या पदापासून. आपल्या अनुभव आणि कौशल्यातून त्यांनी हाती घेतलेल्या प्रत्येक कामात स्वतःची छाप पाडली.

  • डॉ. बी.आर. बारवाले स्वतंत्र संचालक:

    डॉ बी.आर बारवाले, महाराष्ट्र संकरित बियाणे कंपनी लिमिटेडचे (महिको) अध्यक्ष असून ते त्यांच्या दूरदृष्टीसाठी तसेच प्रमुख उद्योजक, समाजसेवक आणि शिक्षणतज्ञ म्हणून ओळखले जातात. शेतीची पार्श्वभूमी असलेल्या एका कुटुंबातून आलेल्या डॉ बारवाले यांनी या क्षेत्रात आपलं योगदान देऊन देशाच्या प्रगतीसाठी एक मोठं कार्य केलं आहे. त्यांना भारतीय बियाणे उद्योगाचे जनक म्हणून ओळखले जाते. याशिवाय कृषी उद्योगातील योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये १९९८ मध्ये वर्ल्ड फूड प्राइझ फाउंडेशनकडून दिल्या जाणा-या वर्ल्ड फूड प्राइझचा (१२वा वर्ल्ड फूड प्राइझ) समावेश आहे. फेडरेशन इंटरनॅशनल सीड्समेनच्या आंतरराष्ट्रीय शिखर समितीचे ते मानद आजीवन सदस्य आहे.

    अधिक वाचा

    डॉ बारवाले यांचा मार्च २००१ मध्ये व्यापार आणि आर्थिक क्षेत्रातील सर्वोच्च आणि महत्त्वपूर्ण योगदानासाठी पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत २ पुस्तके लिहिली: बियाण्यांसोबतचा प्रवास आणि भारतीय बियाणे उद्योगाचा विकास' आणि 'भूमी पुत्र'

  • श्री. उदय गर्गगुंतवणूकदार नॉमिनी संचालक

    श्री उदय गर्ग हे मार्च २०१५ पासून मंडल कॅपिटल ए लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकदार नॉमिनी संचालक म्हणून प्रतिनिधित्व करतात. श्री गर्ग हे मंडल कॅपिटलचे संस्थापक असून, खाजगी इक्विटी फंड व्यवस्थापक आणि २००८ मध्ये स्थापना झाल्यापासून त्यांनी व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केले आहे. याआधी त्यांनी ड्युएट ग्रुप, अल्टिमा पार्टनर्स आणि अमरनाथ अॅडव्हायजर्स सोबत काम केले आहे. डॉइश बँकेत इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून त्यांनी आपल्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केली. श्री गर्ग यांनी पेनसिल्वेनिया विद्यापीठाच्या व्हॉर्टन स्कूल ऑफ बिझनेस येथून वित्त हा विषय घेत अर्थशास्त्राबमध्ये पदवी मिळवली आहे.

    अधिक वाचा

    श्री गर्ग हे भारतातील बारवाले कुटुंबातील एक सदस्य आहेत. बारवाले कुटुंबिय हे मायसो (Mahyco) या भारतातील सर्वात यशस्वी कृषीव्यवसायाचे संस्थापक तसंच संचालक म्हणून ५० वर्षांचा अनुभव असून भारतातील सर्वात मोठया बियाणे व्यवसायाचे ते मालक आहेत तसंट मोसॅंटो सोबत भागीदार आहेत.

  • श्री विनय जोशीकार्यकारी संचालक - गोदावरी बायोरिफनीज लिमिटेड

    श्री विनय जोशी वाणिज्य लेखांत पदव्युत्तर असून पुणे विद्यापीठातून वित्तीय लेखांकन,खर्च आणि व्यवस्थापन लेखनात विशेष कौशल्ये प्राप्त आहेत. ते विविध उद्योगांशी संबद्ध आहेत ज्यामध्ये सुगर, इथनॉल, केमिकल्स, फूड प्रोसेसिंग, पॉवर आणि पुस्तक प्रकाशन इत्यादींचा समावेश आहे. ३५ वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांनी सोमैया ग्रुप ऑफ कंपनीजशी वेगवेगळ्या पदांवर काम केले आहे.

    अधिक वाचा

    श्री विनय जोशी २ वर्ष (२०१६ आणि २०१७) साठी दक्षिण इंडियन शुगर मिल्स असोसिएशन - कर्नाटक (एसआयएसएमए-के) चे अध्यक्ष होते. त्यांनी भारतातील केंद्र व राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांसमोर साखर, इथेनॉल आणि वीज उद्योग हितसंबंधांचे प्रतिनिधित्व केले आहे.

    ते इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (आयएसएमए) चे एक समिती सदस्य आहेत आणि इंडियन इंडस्ट्री ऑफ कॉन्फेडरेशन (सीआयआय) च्या महाराष्ट्र फायनान्स अँड टॅक्सेशन पॅनेलचे देखील सदस्य आहेत.

    श्री. विनय जोशी यांनी शुगर, इथनॉल आणि इथेनॉल आधारित केमिकल्सच्या क्षेत्रात विलीनीकरण, एकत्रीकरण आणि अधिग्रहण प्रस्ताव यशस्वीपणे व्यवस्थापित केले आहेत.

    विविध आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय संघटना जसे उद्योग संघ, चेंबर ऑफ कॉमर्स आणि विविध शासकीय अधिकाऱ्यांसमोर त्यांनी सोमैया ग्रुपचे प्रतिनिधित्व केले आहे.

  • श्री एस मोहननॉन-एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर:

    श्री एस मोहन मद्रास विद्यापीठातून विज्ञान विषयातील पदवीधर आहेत. अल्कोहोलआधारित रासायनिक उद्योगाचा त्यांना ३५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. २०१० पासून पेंटोकी ऑरगॅनी इंडिया लिमिटेडचे ते संचालक (कामकाज) आहेत तसंच साकरवाडी गोदावरी बायोरीफिनेरीस लिमिटेडचेही ते संचालक आहेत.

  • श्री कैलास परशादस्वतंत्र संचालक

    श्री कैलास परशाद हे इंजिनीअर असून वित्त, विपणन आणि व्यवस्थापन क्षेत्रात त्यांनी ४० वर्षांचा अनुभव आहे. ते कॉर्पोरेट्ससाठी सल्लागार म्हणून काम करत असतानाच आयसीआयसीआय, आयडीबीआय, यूटीआय बँकांसाठी नॉमिनी डिरेक्टर म्हणून काम पाहतात.

  • डॉ. के व्ही राघवनस्वतंत्र संचालक

    डॉ के राघवन भारतीय राष्ट्रीय अभियांत्रिकी अकादमी (INAE - शैक्षणिक आणि आंतरराष्ट्रीय सहकार) आणि फेडरेशन ऑफ आशियाई जैवतंत्रज्ञान असोसिएशन (FABA)चे  उपाध्यक्ष आहेत. डॉ के राघवन हे अणु ऊर्जा नियामक मंडळाचे सदस्य आहेत तसंच आणि हेवी वॉटर बोर्डाचे (भारत सरकार, मुंबई) संचालक आहेत. तसंच डीआरडिओच्या कॅटॅलॅटिकल इथेनॉल रिफॉर्मिंग, नॅनोफ्लुइड सिस्टम्स आणि इतर धोरणात्मक प्रकल्पांसाठी असणार-या प्रोजेक्ट रिव्ह्यू आणि मॉनलिटरिंग समितीचे ते अध्यक्ष आहेत. भारत सरकारच्या वन आणि पर्यावरण मंत्रालयाच्या संशोधन आणि विकासासाठीच्या शिखर समितीचे ते सदस्य आहेत.

    अधिक वाचा

    त्यांनी १९६४ मध्ये उस्मानिया विद्यापीठातून बी.टेक आणि इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी), मद्रास पासून एम.एस आणि पीएचडी पूर्ण केलेली आहे. ते १९६४ मध्ये सीएसआयआरच्या सेवेत रूजू झाले. मे २००४मध्ये भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या डिआरडिओसाठीच्या भरत आणि मूल्यांकन समितीसाठी त्यांना अध्यक्ष बनवण्यात आलं.

    भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय तसंच आरोग्य मंत्रालयासाठी वैज्ञानिक सल्लागार समितीचे ते सदस्य होते. आंध्रप्रदेश सरकारच्या नैसर्गिक वायू वापर आणि औषध संशोधन आणि विकास निधीसाठी स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीवरही ते होते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल इंजिनीअर्स आणि आंध्रप्रदेश विज्ञान अकादमीचे ते माजी अध्यक्ष आहेत.

  • डॉ. प्रीती रावत स्वतंत्र संचालक

    डॉ प्रीती एस रावत या के.जे,सोमय्या मॅनेजमेंट स्टडीज आणि संशोधन (SIMSR) च्या प्रोफेसर (OB / HRM) आहेत. येथे त्या विविध व्यवस्थापन अभ्यासक्रमांसाठी अध्यापन करतात तसंच भारतातील विविध विद्यापीठांमध्ये व्यवस्थापन विषयात संशोधन (पीएच.डी) करणा-यांसाठी त्या मार्गदर्शक (गाइड) म्हणून कार्यरत आहेत.

    अधिक वाचा

    सेज प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या 'व्यवसाय दृष्टीकोन आणि संशोधन' या SIMSR प्रसिद्ध केलेल्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन जर्नलच्या संपादिका आहेत. डॉ. रावत यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये आपले संशोधन प्रकाशित केले आहे तसंच अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग नोंदवला आहे. वर्कप्लेस एम्पवॉरमेंट या पुस्तकाच्या त्या लेखिका आहेत. या क्षेत्रातल्या कनिष्ठ, मध्यम आणि वरिष्ठ व्यवस्थापनाला देण्यात येणा-या बिहेव्हिअरल ट्रेनिंग प्रोग्राम्समध्येही त्या सहभागी होतात.

  • डॉ. पौल झोर्नरस्वतंत्र संचालक

    डॉ पॉल झोर्नर यांनी वनस्पतिशास्त्र आणि प्लांट पॅथालॉजी या विषयांमध्ये कोलोरॅडो स्टेट युनिव्हर्सिटीमधून पीएचडी पूर्ण केली आहे. कोरड्या जमिनीवरील शेतीसाठी पीक प्रणाली विकास करण्यामध्ये त्यांनी हे संशोधन केलं आहे.

    अधिक वाचा

    डॉ. पॉल झोर्नर हे अनेक कंपन्यांसाठी संचालक तसंच वरिष्ठ सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. पुनर्वापरयोग्य इंधने, रसायने तसेच शेतीविषयक बायोमासेसमधून तयार होणारी अतिउपयुक्त जैविकघटकांवर काम करणा-या कंपन्यांशी ते संलग्न आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील त्यांचा अनुभव फार मोठा आहे. साखर आणि रसायन क्षेत्रातील उत्पादन, इंजिनीअरिंग, फॅक्टरी ऑपरेशन्स, प्लांट कल्टिवर सिलेक्शन, आणि आधुनिक तंत्रज्ञानाचं परवाना मिळवणे तसंच अंमलबजावणी करणे, गव्हर्नमेंट रिलेशन्स, धोरणे अशा विविध विषयांमध्ये त्यांना दांडगा अनुभव आहे. विज्ञाननिष्ठ विकास आणि कामकाजासाठी तसंच स्टार्टअप्ससोबत त्यांनी काम केलेले आहे. तसंच कृषी, रसायने आणि पुनर्वापरयोग्य ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असणा-या फॉर्च्युन ५०० कंपन्यांमध्ये वरिष्ठ प्रशासकीय पदाचा त्यांना अनुभव आहे.

    डॉ. पॉल हे अमेरिकेतील तण विज्ञान सोसायटीचे फेलो आहेत. त्यांच्या नावावर ३५ अमेरिकन पेटंट्स आहेत. २००६ मध्ये त्यांना ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड सरकारकडून क्वीन्सलँड चॅम्पियन म्हणून गौरवण्यात आलं. असा गौरव झालेले त पहिलेच अमेरिकन नागरिक आहेत.

  • श्री. जयेंद्र शाहस्वतंत्र संचालक

    श्री. जयेंद्र शाह मुंबई विद्यापीठातून कला (अर्थशास्त्र) मध्ये बॅचलर पदवी आणि भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्स संस्थेचे एक पात्र चार्टर्ड अकाउंटंट आहेत.

    अधिक वाचा

    श्री. जयेंद्र शाह एक कुशल व्यावसायिक सल्लागार आहेत आणि ३० वर्षाचा अनुभव घेऊन एनए शाह असोसिएट्स, चार्टर्ड अकाउंटंट्सचा एक वरिष्ठ भागीदार आहे.

    त्यांचा व्यापक धोरणात्मक ज्ञान आणि कार्यान्वयन अनुभव संस्थांना बाजारपेठेत संभाव्यता प्राप्त करण्यास सक्षम बनविते. त्यांचे ग्राहकांना मूल्य वितरित करण्याचे आणि वाढीचा विकास करण्याचे एक स्थापित ट्रॅक रेकॉर्ड आहे.

  • प्रा.एम. लक्ष्मी कंटमस्वतंत्र संचालक

    प्रा. लक्ष्मी कंटम या केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टिअर्ड ऑफ ग्रीन केमिस्ट्री अँड सस्टेनेबिलिटी इंजिनिअरिंग, केमिकल टेक्नॉलॉजी संस्थान, माटुंगा, मुंबई -४०००१९, भारत इथे डॉ बी.पी. गोदरेज प्रतिष्ठित प्राध्यापिका आहेत. रासायनिक उद्योगासाठी अभिनव हिरव्या आणि किफायतशीर प्रक्रियेसाठी उत्प्रेरकांच्या संशोधन, रचना आणि विकासामध्ये त्यांना ३३ वर्षांचा अनुभव आहे.

    अधिक वाचा

    पूर्वी, सीएसआयआर-आयआयसीटी, हैदराबाद येथे त्यांनी संचालक म्हणून काम केले. त्यांनी ३३२ पेक्षा अधिक प्रकाशने, ४२ पेटंट्स आणि पाच पुस्तकांचे अध्याय लिहिले आहेत. त्या तेजपूर सेंट्रल युनिव्हर्सिटी, तेजपूर, आसाम आणि आरएमआयटी विद्यापीठ, मेलबर्न, ऑस्ट्रेलिया येथे एक सहाय्यक प्राध्यापक आहे. त्या इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी आणि नॅशनल ऍकॅडमी ऑफ सायन्सेसच्या सहकारी आहेत.