शिक्षण
लहान मुलांच्या शिक्षणासाठी
आंगणवाडी – सोमैया शिशुविहार
ग्रामीण विकासासाठी महत्त्वाची पायरी म्हणजे लहान मुलांचं शिक्षण. फक्त आदिवासी भाषा ज्ञात असणा-या या मुलांना; ज्या भाषेतून शिक्षण दिलं जातं त्या भाषेशी ओळख करून दिली जाते.
मुलभूत गरजांपासून वंचित राहणा-या शून्य ते 6 वर्षे वयोगटातील मुलांना पोषक वातावरण मिळावं यासाठी आम्ही राज्य सरकारच्या आंगणवाडी प्रकल्पाशी स्वतःला जोडून घेतलं आहे. कर्नाटकातल्या बेळगाव आणि बागलकोट जिल्ह्यातील गावांमधल्या तीन ते पाच वर्षे वयोगटातील मुलांना मूल्यवर्धित शिक्षण मिळावं यासाठी आम्ही सोमैया शिशुविहारच्या माध्यमातून 20 आंगणवाडी केंद्रांना सहाय्य करत आहोत. शैक्षणिक साहित्य, खेळणी, स्वयंसेवकांना मानधन, शिक्षकांना प्रशिक्षण आम्ही देतो तसंच वर्ग नियमितपणे भरले जातील याकडेही आम्ही जातीने लक्ष घालतो.
वर्षाकाठी दोन हजार पेक्षा जास्त मुलं याचा लाभ घेतात.
सोमैया शिशुविहार (आंगणवाडी केंद्र)
माझं नाव अर्जुन. आमच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत म्हणजे शेती आणि कृषी वेतन. मला तीन मुलं आहेत. एक दुस-या इयत्तेत आहे आणि दोघे प्रायमरीमध्ये. आम्ही शेतावरल्या घरातच राहतो.
माझा मुलगा सोमैया शिशुनिकेतनमध्ये शिकला आणि माझ्या दोन्ही मुली तिथेच शिकत आहेत. आमच्या इथे कुठलीही सरकारी पूर्व प्राथमिक शाळा नसल्यामुळे हे केंद्र माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप उपयुक्त आहे. माझ्या घरापासून सरकारी आंगणवाडी 3 किलोमीटरवर आहे. आम्ही रोज शेतावर कामाला जातो. त्यामुळे इतक्या दूर सरकारी आंगणवाडीमध्ये मुलांना पोहोचवणं आणि परत आणणं हे आमच्यासाठी कठीण काम आहे. या केंद्राचा आम्हाला फारच फायदा झाला आहे आणि आम्ही समीरवाडी कारखान्याचे त्यासाठी आभारी आहोत.
श्री. अर्जुन एम. दद्दीमानी
- वय – 32 वर्षे
- |
- व्यवसाय – शेती
- |
- गाव – हंडीगुंड गाव, बेळगाव जिल्हा, कर्नाटक
- |
- पात्रता – तिसरी इयत्ता
माझं नाव निंगाप्पा. मी शेती करतो. मला चार मुलं आहे. त्यापैकी दोघं सोमैया पूर्व-प्राथमिक शाळेत जातात. दुसरी दोघं तीन वर्षांखालील आहेत.
आमच्या घराजवळ कुठलीही सरकारी शाळा नसल्यामुळे सोमैया स्कूल आमच्यासाठी फार उपयुक्त आहे. मी अशिक्षित आहे पण माझी दोन्ही मुलं शिकत असल्याचा मला आनंद आहे.
श्री. निंगाप्पा एस ब्याकोद,
- वय : ३० वर्षे
- |
- व्यवसाय : शेती
- |
- गाव: कर्नाटकमधील बागलकोटडिस्टमधील केसरगावप्पा गाव
- |
- पात्रता: Nil
ग्रामीण शाळा – सोमैया विद्यामंदिर
गरीबांचं जीणं सुकर करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण. हे लक्षात घेऊनच आमचे संस्थापक पद्मभूषण के. जे. सोमैया यांनी विद्यादान हेच श्रेष्ठदानचा निर्णय घेतला. दर्जात्मक शिक्षण देणा-या संस्थांसाठी त्यांनी 1959 मध्ये ट्रस्टची स्थापना केली. विद्या विमुक्तये हे सोमैया विद्याविहारचं ब्रीदवाक्य आहे.
सोमैया विद्याविहारच्या सहयोगाने आम्ही बागलकोटमध्ये दोन कन्नड आणि एक इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली आहे. तर महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यात दोन मराठी आणि एक इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यात आली आहे. या शाळा विस्तीर्ण अशा आवारात बांधलेल्या आहेत. प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय तसंच क्रीडासाहित्यांच्या सोयींनी या शाळा सुसज्ज आहेत. सामाजिक जबाबदारीचं भान ठेवत आम्ही नजीकच्या गावांमध्येही शाळा सुरू केल्या आहेत.
image1
विद्यादान
पद्मभूषण करमशी जेठाभाई सोमैया यांचा जन्म गरीब घरात झाल्यामुळे ते फक्त इयत्ता सहावीपर्यंतच शालेय शिक्षण घेऊ शकले. अनेक संकटांचा सामना करत 1939 मध्ये त्यांनी महाराष्ट्रातल्या साकरवाडी आणि लक्ष्मीवाडीमध्ये साखर कारखाने सुरू केले.
गरीबांचं जीणं सुकर करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण. हे लक्षात घेऊनच आमचे संस्थापक पद्मभूषण के. जे. सोमैया यांनी विद्यादान हेच श्रेष्ठदानचा निर्णय घेतला. दर्जात्मक शिक्षण देणा-या संस्थांसाठी त्यांनी 1959 मध्ये ट्रस्टची स्थापना केली. विद्या विमुक्तये हेसोमैया विद्याविहारचं ब्रीदवाक्य आहे.
सोमैया विद्याविहारने साकरवाडी आणि लक्ष्मणवाडी इथे सोमैया विद्यामंदिर नावाने शाळा सुरू केल्या. कारखान्यांमध्ये येणा-या कर्मचा-यांच्या मुलांना शिक्षण मिळावं यासाठी हा पुढाकार घेण्यात आला. कालांतराने आसपासच्या परिसरातील मुलांनाही या शाळांमध्ये सामावून घेण्यात आलं. साकरवाडी इथली सोमैया विद्यामंदिर आता श्रीरामपूर, रहाटा, कोपरगाव आणि वैजापूर तालुक्यांतल्या वारी, कान्हेगाव, हनुमानवाडी, साडे, भोजाडे, धोत्रे आणि इतर गावांमधल्या मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षण दिलं जातंय. रहाटा तालुक्यातल्या लक्ष्मीवाडीमधल्या सोमैया विद्यामंदिरमध्ये आता कोपरगाव, श्रीरामपूर आणि संगमनेर तालुक्यातली मुलं शिकायला येत आहेत. तसंच निघोज, निमगाव, शिर्डी, रुई, सोनेवाडी, डोरहळे, कोरहळे, निमशीवाडी आणि सावळीविहिर या नजीकच्या गावांमधूनही मुलं शिक्षण घ्यायला येत आहेत.
साकरवाडी इथे 10 एकर इतक्या विस्तीर्ण कॅम्पसमध्ये सोमैया विद्यामंदिर बांधण्यात आलं. प्रशस्त वर्ग, ग्रंथालय, मूव्ही हॉल, प्रयोगशाळा, सुसज्ज अशी कम्प्युटर प्रयोगशाळा आणि संगीत कक्ष अशा सोयीसुविधा या शाळेत आहेत. या सोयीसुविधांमुळे विद्यार्थी अभ्यास आणि अभ्यासेतर उपक्रमांमध्येही निपुण होतात.
साखरवाडी आणि लक्ष्मीवाडी इथे शाळा विकसित करण्यासाठी गोदावरी बायोरिफायनरीजच्या सहकार्याने सोमैया विद्याविहार कार्यरत आहे.
- एस. के. सोमैया कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड कामर्सचे समाजशास्त्राच्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी या गावांमधील प्रत्येक कुटुंबाला भेट दिली. या कुटुंबांची, पालकांची आणि मुलांची सामाजिक-आर्थिक परिस्थिती जाणून घेण्यासाठी ही भेट होती. या भेटीचं सविस्तर विश्लेषण शाळा समितीसमोर ठेवण्यात आलं. या समितीमध्ये श्री. समीर सोमैया, शाळांचे मुख्याध्यापक आणि मुंबईतील शिक्षणतज्ज्ञांचा समावेश होता. विविध समस्यांवर उपाययोजनांवर या समितीमध्ये चर्चा झाली. तसंच विद्यार्थ्यांना समग्र शिक्षण मिळावं यासाठी विविध शिक्षणपद्धती विकसित करण्याबाबतही खल करण्यात आला. प्रतिभावन विद्यार्थी तसंच सामाजिक-आर्थिक समस्यांनी ग्रासलेल्या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी व्यक्तिगत पातळीवर पावलं उचलली गेली.
- के.जे. सोमैया कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजीच्या इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनी साकरवाडी इथल्या विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक्सची कार्यशाळा घेतली.
- मुंबईत संशोधन करणा-या कॉर्नेल युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थी-प्राध्यापकांना शाळेमध्ये आमंत्रण देण्यात आलं होतं. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी वैज्ञानिक प्रयोग केले तसंच शिक्षणाच्या पद्धतींबाबच शिक्षकांशी चर्चा केली.
- शाळेकडे एक दुर्बिण आहे. दरवर्षी नेहरू तारांगणाचे माजी संचालक दोन शाळांना भेटी देतात. तारे आणि ग्रहांवरील चित्रपट दाखवण्याबरोबरच आकाशदर्शनाची सहलही ते आयोजित करतात.
- माध्यान्ह भोजनाचा भाग असलेल्या विद्यार्थ्यांना मिळणा-या जेवणावर गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेडचे अधिकारी लक्ष ठेऊन असतात. याशिवाय तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर शाळेतर्फे आयोजित होणा-या आंतरशालेय स्पर्धांनाही कंपनी सहाय्य करतं.
परिणाम
साकरवाडी - सोमैया विद्यामंदीर(ता. कोपरगाव, जि. अहमदनगर)
97.70 %उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा निकाल
92.20 %शाळेतील टॉपर विद्यार्थीनी तनुजा काळे
20% No. of Students passed with Distinction
1. | तनुजा सी काळे | 92.20 % |
2. | देवयाणी एन घागरे | 92.00 % |
3. | प्रतीक्षा एस मोरे | 91.60 % |
लक्ष्मीवाडी - सोमैया विद्यामंदिर(ता. राहाता, जि. अहमदनगर)
91.30 %उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा निकाल
94.00 %शाळेतील टॉपर विद्यार्थीनी पुजा के त्रिभूवन
16% No. of Students passed with Distinction
1. | पुजा के त्रिभूवन | 94.00 % |
2. | वृषाली एस घाणे | 92.80 % |
3. | प्रियंका ए पघीरे | 91.80 % |
4. | रुद्रा ए जांबूलकर | 91.80 % |
प्राचार्यंचे विचार
प्राचार्य विद्या मंदिर, सावकारवाडी
"आम्ही मुलांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये स्वतःला सामील करतो, त्यांना अडचणींना सामोरे जाताना मदत करतो, पुढे आम्ही शिक्षणाचे महत्त्व आणि त्याचा विद्यार्थी व समाजावर सकारात्मक प्रभाव यावर पालकांचे समुपदेशन करतो. त्याशिवाय त्यांच्या पाल्यांच्या प्रगतीबद्दल माहिती देऊन मुलांना प्रेरित आणि प्रोत्साहित कसे करता येईल याबद्दल देखील मार्गदर्शन देतो."
कमी उत्पन्न असलेल्या पार्श्वभूमीचे पालकांसाठी मुलांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे हे एक आव्हान असते. आपल्या मुलासाठी शिक्षणाचे महत्वाचे असले तरी ते घरी अभ्यास करण्यासाठी आपल्या मुलास समर्थन देऊ शकत नाहीत. त्यांच्यासाठी रोजची कमाई मिळविण्यासाठी दिवसभर मेहनत करावी लागते. मुले सहसा घरात काम करण्यास मदत करतात आणि काही जण शेतात काम करतात. आम्ही याबाबत संवेदनशील आहोत आणि मुलांना हे प्रेरित राहतील याची आम्ही जबाबदारी घेतो. म्हणूनच शिक्षण उपलब्ध आणि परवडणारे असणे आवश्यक आहे. जेव्हा पालक शाळांना चांगल्या दर्जाची पाहतात तेव्हा आपल्या पाल्याला तेथे शिकविण्यासाठी जे बलिदान ते देतात ते सफल होते. .
कारखाना व्यवस्थापन आणि सोमैया विद्याविहार ट्रस्ट शाळेत खूपच स्वारस्य दाखवतात. यामुळे गावकऱ्यांना आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यात विश्वास वाटतो. "
प्राचार्य विद्यामंदिर, लक्ष्मीवाडी
"शिक्षणाचे माध्यम मराठी मध्ये आहे, म्हणून पालकांना आपल्या मुलांना शिक्षण देणे सोयीस्कर होते. आम्ही आपल्या विद्यार्थ्यांना उत्तम व्यक्ती बनण्यास प्रोत्साहन देतो. मुलांनी, स्वत: वर्गांच्या काही भिंती सजविल्या आहेत. शाळेमध्ये मुली आणि मुलांसाठी वेगळे शौचालये आहेत. यामध्ये फ्लश सुविधा असल्यामुळे मुलींच्या हजेरीवर सकारात्मक परिणाम आहेत."
शाळेत टेबल टेनिस, क्रिकेट, फुटबॉल, हँडबॉल आणि इतर ग्रामीण खेळ यांसारख्या विविध क्रीडा सुविधा असलेल्या भव्य बॅडमिंटन हॉल आहे. आम्ही विद्यार्थ्यांना तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर आंतरशालेय स्पर्धांचे भाग घेण्यास प्रोत्साहित करतो. आम्ही जिल्हास्तरीय स्पर्धा देखील शाळेत घेतो. यामुळे आमच्या विद्यार्थ्यांना राज्यभरातील विद्यार्थ्यांना भेटण्याची संधी मिळते. संगीत आणि नृत्य या कलाप्रकारांना देखील प्रोत्साहन दिले जाते.श्री. समीर सोमैय्या विद्यार्थ्यांना नियमितपाने भेटतात व त्यांच्यासोबत वेळ घालवतात. प्लांटमध्ये येत असलेले अतिथी,विद्यार्थ्यांना भेट देतात आणि त्यांच्याशी संवाद साधतात. या सर्व गोष्टीमुळे शाळा ही शैक्षणिक आणि उत्साहवर्धक अनुभव ठरते.
शाळेच्या चांगल्या सुविधांमुळे, आम्हाला चांगले शिक्षक मिळतात. सोमैया विद्याविहार कुटुंबाचा एक भाग असल्याबद्दल खूप अभिमान आहे.