समुदायाचा सहभाग

CSR - Community Involvement

2003 : EDUCATION

२००३ : शिक्षण
२००३ मध्ये, प्राथमिक शाळेत विद्यार्थी उपस्थिती सुमारे ६५ ते ७० टक्के होती. ४-५ महिन्यांच्या अवधीत घरोघरी भेटी देऊन आणि विद्यार्थ्यांच्या पालकांचं समुपदेशन केल्यानंतर ही उपस्थिती १०० टक्के झाली. यापूर्वी शाळा या फक्त ७ वी इयत्तेपर्यंतच होत्या. त्यामध्ये सुधारणा करत 10वी पर्यंतच्या वर्गांना सुरूवात करण्यात आली. सुरुवातीला वर्गखोल्यांची कमतरता होती. मात्र सरकारी अधिकारी आणि आमच्या सततच्या प्रयत्नांनी आधीच्या ६ खोल्यांमध्ये वाढ झाली आणि आता १० खोल्या उपलब्ध झाल्या आहेत.
मुलामुलींसाठी प्रसाधनगृहं आणि ओपन एअर थिएटरची सुविधाही पुरवण्यात आली आहे. तसेच शिक्षकांची संख्या ४ वरून ९ करण्यात आली आहे. त्यानंतर आम्ही किमान दोन महिन्यांतून एकदा सामान्य ज्ञान परीक्षा, निबंध स्पर्धा, विज्ञान प्रश्नमंजुषाही आयोजित केल्या. या चाचण्यांमुळे विद्यार्थ्यांचं ज्ञान चांगल्या प्रकारे विकसित झालं आणि अधिक विद्यार्थी निवासी शाळांमध्ये दाखल झाले.
2003 : EMPLOYMENT
2003 : रोजगार
सरोवर: गावात उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा तीव्र तुटवडा भासत असे. पिण्याचे पाणी आणण्यासाठी गावातील लोकांना बरीच पायपीट करावी लागायची. बोअरवेल, खुल्या विहिरी आणि नाले-ओढे सुकून जायचे. ही परिस्थिती पाहून SGVKने गावातील सखल भागात पाण्याची टाकी तयार करण्यासाठी गावक-यांना प्रवृत्त केलं. गावकऱ्यांच्या मदतीने काही महिन्यांतच सुमारे 15 एकर इतकं मोठं सरोवर तयार करण्यात आले. पाणी वळवल्याचा घटप्रभा कालव्याचं पाणी वळून या सरोवरात सोडण्यात आलं. तेव्हापासून (डिसेंबर – २००४ पासून) भुगर्भातील पाण्याच्या पातळीत योग्य वाढ झाल्याने पाण्याचं दुर्भिक्ष्य दूर झालं आणि शेतीलाही पाणीपुरवठा होऊ लागला. या तलावाच्या बांधकामामुळे गावाचं तसं आसपासंच्या भागाचं सुशोभिकरण झालं आहे आणि कृषी क्षेत्रात रोजगार उपलब्ध झाला आहे.