भूमिलाभ ®

चौकशी करा

ओव्हरव्ह्यू

गोदावरी बाईरिफायनरी लिमिटेड ही कंपनी भूमिलाभ, सेंद्रिय जैव - मिश्रण तयार करते आणि विकते. उच्च सुपीकता, उत्तम उत्पन्न आणि कमीत कमी रासायनिक खतांचा वापर यांची हे उत्पादन खात्री देते. मातीची गुणवत्ता वाढवणारे आरोग्यपूर्ण फळे, भाज्या, फुले, पिके, धान्य, झाडे, बगीचे तयार करण्यासाठी मदत करणारे भूमिलाभ हे उच्च दर्जाचे १०० टक्के नैसर्गिक उत्पादन आहे.

जगभरात होणारा रासायनिक खतांचा वापर मातीची गुणवत्ता खालावत आहे. त्याचाच परिणाम म्हणून पिकाचे उत्पादन आणि उत्पन्न कमी होणे तसेच पौष्टीकतेत घट आदी बाबी दिसून येत आहेत. तेव्हा शेतकऱ्यांना हे कळून चुकले आहे की आता सेंद्रिय शेतीकडे वळण्याची वेळ झाली आहे.

मातीची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे भूमिलाभ. हे उत्पादन मातीची गुणवत्ता सुधारत आयुष्य वाढवते. यामुळे मातीची भौतिक आणि जैविक गुणवत्ता सुधारते आणि उपयोगी मायक्रोबच्या वाढीस मदत होते. मातीचे सुधारलेले आयुष्य झाडांची निरोगी वाढ आणि विकास यासाठी महत्त्वाचे असते. भूमिलाभ संतुलनाचे कार्य करते आणि पिकाचे रासायनिक खतांवर अवलंबून असणं कमी करते. सर्व प्रकारच्या हंगामात आणि मातीवर हे उपयुक्त आहे.

ऍप्लिकेशन्स (उपयोजन)

भूमिलाभ हे नैसर्गिक काम्पोस्त पद्धतीने तयार केलेलं उत्पादन असून गोदावरी बायोरिफायनरी ते बाजारात घेऊन आले आहे. मातीच्या आरोग्यासाठी आणि जैविक आणि भौतिक गुणधर्म वाढवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. याचा वापर केल्याने पाण्याची गरज कमी होते, पिकांचे वय वाढते एकूण उत्पादनाची किंमत कमी करणारे हे आमचे उत्पादन आहे.

फायदे

१. भौतिक

  • सर्व प्रकारच्या मातीसाठी उपयुक्त.
  • प्रत्येक हंगामात वापरण्यास योग्य.
  • मातीची गुणवत्ता सुधारण्यासाठी.
  • मातीचा पोत सुधारण्यासाठी.
  • मुलांच्या वाढीसाठी योग्य वातावरण निर्माण करण्यासाठी.
  • मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवण्यासाठी
  • मातीची धूप रोखण्यासाठी.
  • मातीला छान सुगंध देण्यासाठी.
  • यात सर्व महत्त्वाचे पौष्टिक नैसर्गिक घटक समाविष्ट असतात.


२. आर्थिक

  • कच्च्या मालाची कमी किंमत.
  • प्रक्रिया करण्यासाठी आणि देखभाल करण्यासाठी कमी किंमत.
  • उत्तम नफा.
  • उच्च उत्पादन.


३. ३ ते ५ वर्षांनी होणारे सेंद्रिय-रासायनिक पर्यावरणीय फायदे

  • सर्व पिकांचे उत्पादन वाढते : २० - ४० टक्के
  • रासायनिक खतांचा वापर कमी होतो : २५ – ३० टक्के
  • कीटकनाशकांचा वापर कमी होतो : ४० – ५० टक्के
  • पिकांचा मजबूतपणा आणि आयुष्य वाढवत उत्पादनाची एकूण किंमत कमी होते : २५ – ३० टक्के
  • किरकोळ जागेचे पुनर्वसन करता येते. १०- ३० टक्के जागेला पूर्ण उत्पादनाखाली आणता येते.
  • पिकाचे स्वाद, गुणवत्ता, आयुष्य सुधारते.


४. पर्यावरणीय

  • यामध्ये सेंद्रिय आणि पौष्टिक घटक समाविष्ट आहे.
  • विडच्या बिया, रोगजनक झाडे यामध्ये येत नाहीत.
  • फळे, फुले, भाज्या. आणि पिके नैसर्गिकपणे विकसित होतात.
  • याचा वापर माती, पाणी आणि कचरा व्यवस्थापन यामध्ये उत्तम होतो.
  • कोणतीही उलट प्रक्रिया होत नाही आणि उत्तम वातावरण राखले जाते.
  • कोणताही प्रतिकूल परिणाम नाही आणि चांगले वातावरण.
  • जमीन माती, पाणी आणि कचरा यांचे एकत्रित मदत व्यवस्थापन करते.


५. रासायनिक

  • मातीमध्ये पौष्टिकता समाविष्ट करत रासायनिक खतांवर अवलंबून राहणे कमी होते.
  • पाणी आणि इतर पौष्टिक घटक मातीमध्ये मिसळले जातात.
  • पाणी वाहून जाण्याचे प्रमाण कमी होत, पाणी अडून राहते.
  • मुबलक आणि गरजेपुरत्या प्रमाणात पौष्टिक घटक मिळतात.

पॅकेजिंग

पॅक आकार
१, २, ५, २५ आणि ५० किलोग्रॅमच्या बॅगमध्ये उपलब्ध आहेत. तसेच सुटेही देण्यात येईल.

उत्पादन जीवन
थेट सूर्यप्रकाश आणि पाऊस यांपासून सांभाळल्यास पॅक केल्यापासून २ वर्षे टिकते.