
आमच्याविषयी
आमची कंपनी जैव परिष्करणाच्या (बायो रिफायनिंग) माध्यमातून साखर, इतर खाद्यपदार्थ, जैवइंधन, रसायने, ऊर्जा, कम्पोस्ट, मेण आणि त्यासंबंधीची इतर उत्पादने तयार करते. विशेष म्हणजे या प्रक्रियेसाठी जैवइंधन म्हणून ऊसाचा वापर आम्ही करतो. आमच्याकडील जैवइंधनाचा अधिकाधिक वापर करत संशोधन आणि नवनिर्मितीच्या माध्यमातून नवनवीन उत्पादने तयार करणे तसंच नवीन बाजारपेठांचा शोध घेणे हेच आमचं उद्दिष्ट आहे. शाश्वत शेती, बायोमासचं परिवर्तन (रासायनिक, यांत्रिक आणि जैविक), उत्पादन विकास आणि प्रक्रियेचं इष्टतमीकरण प्रोसेस ऑप्टिमायझेशन) या क्षेत्रांमध्ये आम्ही प्रामुख्याने संशोधन करतो. बायोमासचा वापर करत त्यावर प्रक्रिया करून विविध उत्पादने तयार करण्याचे हे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे.१९३९ मध्ये सुरू झालेली आमची कंपनी या क्षेत्रातली प्रवर्तक आहे.
आणि आता आम्ही एक पाऊल पुढे टाकत ऊसाच्या चिपाडांपासून जैव परिष्करण (बायो रिफायनिंग) करण्याच्या तसंच साखरेमध्ये जैवपरिवर्तन करत जैवबहुलक (बायोपॉलिमर) तयार करण्याच्या प्रक्रियेवर काम करत आहोत.
आमच्या ऊस विकास उपक्रमाच्या माध्यमातून शास्त्रीय, कृषीविषयक आणि तांत्रिक उपाययोदना पुरवत २०० गावांमधल्या २० हजार शेतक-यांसोबत आम्ही काम करतो. समीरवाडी इथल्या के. जे. सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ अल्पाइड अॅग्रीकल्चरल रिसर्चच्या (केआयएएआर) सहकार्याने आमचे शास्त्रज्ञ आणि कृषीतज्ज्ञ शेतक-यांसाठी उत्तम पद्धती निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत. अशा पद्धती ज्यांचा अवलंब केल्याने अल्प आणि दीर्घकालीन पर्यावरणीय आणि आर्थिक शाश्वतता प्रस्थापित होणं शक्य होईल.
आम्ही किरकोळ व्यापारी, कारखाने तसंच ग्राहकांसाठी साखरेचं उत्पादन करतो आणि निर्यात करतो. भारतीयांना चांगल्या दर्जाचं अन्न मिळावं यासाठी ऑक्टोबर २०१४ मध्ये आम्ही जीवना हा रिटेल ब्रँड सुरू केला आहे. या ब्रँडच्या निर्मितीमध्ये शेतक-यांचा सहभाग असल्यामुळे त्यांचा जीवनस्तरही वाढत आहे. जीवानाची सर्व उत्पादनं जबाबदारीने वाढवली आणि तयार केली जातात.
साखर उत्पादनातील बायप्रॉडक्ट मोलॅसेसचा फीडस्टॉक म्हणून वापर करत इथेनॉलची निर्मिती करण्यामध्ये आम्ही देशात अग्रेसर आहोत. केमिकल्सच्या निर्मितीमध्ये फीडस्टॉक म्हणून इथेनॉलचा वापर करण्यास आम्ही सुरूवात केली. अॅसिटाल्डिहाइड, इथाइल अॅसिटेट, क्रोटॉनाल्डिहाइड, एमपीओ, पॅराल्डिहाइडसारख्या केमिकल्सचं आम्ही उत्पादन करतो. अढेसिव्ह्ज. सॉल्व्हंट्स, शाई, फ्लेवर्स, प्लास्टिक अशा दैनंदिन वापरातल्या वस्तूंमध्ये आमची उत्पादनं वापरली जातात.
आमच्या संशोधन केंद्राला काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रिअल रिसर्च (सीएसआयआर)ची मान्यता आहे. पुनर्वापरायोग्य असा शेतीसाठीचा फीडस्टॉक वापरणं हे पारंपरिक ऊर्जास्रोत वापरण्यापेक्षा वेगळं आहे असा आमचा ठाम विश्वास आहे. पारंपरिक ऊर्जास्रोतांत्या वापरामुळे पृथ्वीच्या नैसर्गिक संपत्तीवर ताण येतो. मात्र पुनर्वापरायोग्य ऊर्जास्रोत किंवा फीडस्टॉप वापरल्यामुळे पृथ्वीची स्रोतनिर्मिती वाढू शकते आणि तिच्या नैसर्गिक संपत्तीवर ताणही येत नाही.
शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण विकास साधत समाजासाठी काम करण्यावरच आमची कंपनी भर देते.


गुंतवणूकदार
कंपनीने मुदत ठेवींना (फिक्स्ड डिपॉझिट) सुरूवात केली आहे. अर्ज तसंच डीपीट-1 अर्थात जाहिरातीच्या रूपातलं परिपत्रक येथे देत आहोत.
फॉर्म डाउनलोड करा
उत्पादन
आम्ही मुख्यत्वे साखरेचे औद्योगिक उत्पादन (घाऊक) तसंच इथेनॉलसारखी खास पद्धतीची रसायने, जैविक खते, जैवऊर्जानिर्मिती, विविध प्रकारच्या उसांची लागवड आणि औषधं तसंच जैवरसायनांचे संशोधन यांसारख्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहोत.
अधिक वाचा

गुणवत्ता धोरण
ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्याकरता उत्पादनांची निर्मिती आणि पुरवठा करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.सांघिक कामगिरी आणि कामगिरीत सातत्याने सुधारणा या माध्यमातूनच गुणवत्ता राखली जाते. गुणवत्तेवरच आमचा ठाम विश्वास असून आमच्या विचारांमध्ये तसंच कृतीमध्ये दर्जाला महत्त्व आहे.
अधिक वाचा
मूल्य साखळी
आम्ही प्रत्येक पायरीला मुल्ये जोडत आणि शक्य तिथे भौतिक, रासायनिक, जैविक पद्धतीने कच्चा मालात जोडत त्यांचे उत्तम उत्पादनात रुपांतर करतो.
अधिक वाचा
पुरस्कार आणि प्रमाणपत्रे
आम्ही आमचे काम गंभीरपणे करतो. आणि त्यामुळेच त्याच्या बदल्यात मिळणाऱ्या पुरस्कारांचा आणि प्रमाणपत्रांचा आम्हाला अभिमान आहे. शासन आणि स्वतंत्र औद्योगिक संस्था यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मिळालेल्या प्रमाणपत्रांचा आम्हाला अभिमान वाटतो. पण आम्हाला अधिक अभिमान वाटतो कारण आमच्या ग्राहकांकडून आम्हाला हे पुरस्कार मिळतात.
अधिक वाचा