
उपजीविकेचे साधन
जेव्हा महिलांना अधिकार दिला जातो,तेव्हा त्यांच्या कुटुंबाच्या आणि समुदायाच्या आरोग्य आणि प्रगतीवर सकारात्मक प्रभाव पडतो. आम्ही ग्रामीण बेरोजगार महिलांसाठी मुढोळ तालुक्यातील मल्लापूर, धवलेश्वर आणि मारापूर, जमखंडी तालुक्यातील अस्की चीमाद आणि नवलगी, रायबाग तालुक्यातील इत्नाल हंडीगुंद आणि कप्पाल्गुडी, गोकाक तालुक्यातील धवलेश्वर, गुर्लापूर हाल्लूर रंगापूर अरालीमात्ती आणि अवर्दी विविध खेड्यांमध्ये १५ सोमय्या ग्रामीण विकास टेलर केंद्र चालवतो. कर्नाटकातील बागलकोट आणि बेळगाव जिल्हात दरवर्षी १५ ते ३० वयोगटातील ३०० महिला टेलर कला शिकून स्वयंरोजगाराची संधी मिळवून दरमहा ३०० रुपये कमवत आहेत.अशा प्रकारे त्यांना आपल्या कुटूंबाच्या मिळकतीत हातभार लावत असताना आपल्या मुलांची काळजी घेणे शक्य होते. आणि म्हणून त्या स्वत:चे आणि आपल्या मुलांसाठी एक चांगले जीवन साकारु शकतात.
यशोगाथा

“मी अपंग आहे. आम्ही शेतकरी कुटुंबातील आहोत. माझे वडील, भाऊ आणि आई दररोज शेतमजूरी करून वेतन मिळवतात. आमच्याकडे कोणतीही मालमत्ता नाही आणि आम्ही आमच्या नातेवाईकांच्या शेतात एका छोट्याश्या झोपडीत राहतो. १० वी नंतर मी माझ्या भावी आयुष्याविषयी चिंतीत होते. मला माझे शिक्षण बंद करावे लागले कारण मला १० किलोमीटर अंतरावरील महाविद्यालयापर्यंत प्रवास करणे फार कठीण होते. "
तेव्हा मला कोणीतरी सोमैय्या ग्रामीण विकास केंद्रा तर्फे समीरवाडीत चालवण्यात येणाऱ्या शिवणकाम वर्गात सामील होण्याविषयी सुचवले. मी या केंद्रात ६ महिने शिवणकामाच प्रशिक्षण घेतलं. लवकरच मी माझा अभ्यासक्रम पूर्ण केला, त्यानंतर मला ग्रामपंचायतने शिवणकाम यंत्र दिले आणि आता मी शिवणकाम सुरु केलं आणि आता मी पूर्ण वेळ काम करत आहे. माझी दरमहा कमाई ४००० ते ४५०० आहे.
शंकरेव्वा बी. नव्वी
- वय: २३ वर्षे
- |
- व्यवसाय: शेती
- |
- गाव:कर्नाटकातील बागलकोट चिल्ह्यातील नवलागी
- |
- शिक्षण : १० वी पास

मी देवदासीची मुलगी आहे. मला एक मोठा भाऊ आणि लहान बहिण आहे. माझी आई आणि भाऊ दररोज शेतमजुरी करतात आणि माझी बहिण ८ वी इयत्तेमध्ये शिकत आहे. मी माझे शिक्षण ७ वी इयत्तेनंतर बंद केले. चार वर्षांपूर्वी मी समीरवाडीतील सोमैय्या ग्रामीण विकास केंद्रात प्रशिक्षण घेतलं. तेव्हापासून मी शिवणकाम हा माझा व्यवसाय निवडला आणि मी माझ्या घरीच शिवणकाम करत आहे. मी आनंदी आहे कि मी माझ्या कुटुंबाला हातभार लावत आहे. मी ३००० ते ३५०० रुपये दरमहा कमावत आहे.
श्रीमती तंगेव्वा एस. दोदावाड
- वय:२० वर्षे
- |
- व्यवसाय: शेती
- |
- गाव: कर्नाटक मधील बागलकोट जिल्ह्यातील चीम्माद गाव
- |
- शिक्षण : ७ वी पास